जागावाटपाविषयी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा !

जागावाटपाविषयी ६ मार्च या दिवशी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. बैठकीपूर्वी धोरणात्मक निर्णयाच्या दृष्टीने दोघांत चर्चा झाली.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे ई मेल ‘हॅक’ !

विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांचा ई मेल आयडी ‘हॅक’ करण्यात आला आहे. या प्रकरणी नार्वेकर यांनी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेचा कोणतीही करवाढ नसलेला १ सहस्र २६१ कोटी रुपये जमेचा अर्थसंकल्प सादर !

वर्ष २०२४-२५ चा नवीन अर्थसंकल्प महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी ५ मार्चला घोषित केला. नागरिकांकडून थेट सूचना मागवून त्याचा अंतर्भाव केलेला, कोणतीही करवाढ नसलेला १ सहस्र २६१ कोटी रुपये जमेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

मुंबईत अधिक भाडे आकारणार्‍या आणि भाडे नाकारणार्‍या ६११ ऑटो रिक्शा अन् टॅक्सी चालक यांच्यावर कारवाई !

मीटरपेक्षा अधिक भाडे आकारणार्‍या ५४ आणि योग्य कारणाविना भाडे नाकारणार्‍या ५५७ ऑटो रिक्शा अन् टॅक्सी चालक यांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप !

हर्षवर्धन पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, इंदापूरमधील मित्रपक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे आणि सभा यांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर एकेरी अन् शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करत आहेत.

आंतरराज्य आणि आंतरजिल्हा सीमाभागातील तपासणी चौक्यांना अधिक मजबुती देण्याचा निर्णय !

येत्या २ महिन्यांत होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि बेळगाव प्रशासनाने आंतरराज्य अन् आंतरजिल्हा सीमा चौक्यांना अधिक मजबुती देण्याचा निर्णय समन्वयक बैठकीत घेतला आहे.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना पॅरोल आणि आयुर्वेदाच्या उपचारांचा अधिकार मिळावा !

खोट्या आरोपांखाली जोधपूर कारागृहात ठेवलेले ८६ वर्षीय संत पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना पॅरोल (संचित रजा) आणि आयुर्वेदाच्या उपचारांचा अधिकार मिळावा. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कारागृहात जाण्यापूर्वी ट्रायजेमिनल न्युराल्जिया आणि पाठदुखी यांचा त्रास होत होता.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर भ्याड आक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी म्हणजे ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व असून त्यांनी अनेक युवकांना दिशा देऊन त्यांना देव, देश अन् धर्म यांच्या रक्षणासाठी कृतीशील केलेले आहे.

‘मुख्यमंत्री माझी शाळा’मध्ये आगाशे विद्यामंदिर रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम

नेहमीच विविध उपक्रम शाळेत होतात. शिवाय संगणक शिक्षण, सुसज्ज वाचनालय, आनंददायी परिसर, सुरेख उद्यान, हुशार विद्यार्थी अशा सर्वच गोष्टीत अग्रेसर असल्याने या शाळेने बाजी मारली.

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे रक्तसंकलनाचे कार्य गौरवास्पद ! – उद्योगमंत्री उदय सामंत

‘‘संस्थानने मोठ्या संख्येने रक्त संकलन करून राज्याची साधारण ४० दिवसांची गरज भागली आहे. यातून महाराजांनी त्यांचा ‘तुम्ही जगा, इतरांना जगवा’, हा उपदेश प्रत्यक्षात आणला आहे.’’