राज्‍यात एका दिवसात कोरोनाबाधित रुग्‍णांच्‍या संख्‍येत दुपटीने वाढ !

महाराष्‍ट्रात २७ मार्च या दिवशी कोरोनाबाधित नवीन २०५ रुग्‍ण आढळले; मात्र २८ मार्च या दिवशी ४५० नवीन रुग्‍ण आढळले. म्‍हणजे एकाच दिवशी कोरोनाबाधित रुग्‍णांच्‍या संख्‍येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

ठाणे पोलिसांनी बजावली ७ जणांना नोटीस

मुंब्रा येथील वन विभागाच्‍या जागेतील अनधिकृत दर्ग्‍यांवर कारवाई केली नाही, तर त्‍याशेजारी हनुमान मंदिर बांधण्‍याची चेतावणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली होती. त्‍यानंतर जाधव यांना धमकी दिल्‍याचा संदेश सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित झाला होता.

भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे पुणे येथे दीर्घ आजाराने निधन

भाजपचे खासदार गिरीश बापट (वय ७२ वर्षे) यांचे २९ मार्च या दिवशी दीर्घ आजाराने निधन झाले. त्‍यांच्‍यावर दीनानाथ मंगेशकर रुग्‍णालयात उपचार चालू होते. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे बनावट टि्‌वटर खाते बनवून भामट्याने पैसे उकळले !

महाराष्‍ट्रातील ‘लेडी सिंघम’ म्‍हणून ओळखल्‍या जाणार्‍या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्‍या नावाने टि्‌वटरवर बनावट खाते उघडल्‍याचा प्रकार समोर आला आहे. या बनावट खात्‍यावरून सायबर भामट्याने एका मुलीचे ‘लिव्‍हर ट्रान्‍सप्‍लांट’ केले असून उपचारासाठी पैशांची नितांत आवश्‍यकता असल्‍याची ‘पोस्‍ट’ टाकली.

आमदार जितेंद्र आव्‍हाड यांच्‍या माजी अंगरक्षकाची आत्‍महत्‍या

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांचे माजी अंगरक्षक आणि अनंत करमुसे यांना मारहाण केल्‍याप्रकरणी जामिनावर सुटलेले पोलीस हवालदार वैभव कदम यांनी आत्‍महत्‍या केली आहे.

गोवा : कांदोळी-कळंगुट येथील १६१ अवैध शॅक्सना टाळे

अवैध शॅक्स असणे प्रशासनाला लज्जास्पद !

आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार गोव्यात ठेवींची रक्कम राज्याच्या सकल उत्पादनापेक्षाही अधिक

धिकोषातील ठेव रक्कम ‘जीडीपी’च्या तुलनेत सुमारे ११ सहस्र कोटी रुपयांनी अधिक आहे. विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थमंत्री या नात्याने राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला आहे. या अहवालात ही माहिती दिली आहे.

वनक्षेत्रांना लागलेल्या आगीमुळे ४ कोटी १८ लाख चौरसमीटर भूमीवर विपरीत परिणाम ! – वनमंत्री विश्वजीत राणे

फोंडा तालुक्यात भोम-अडकोण येथील डोंगराला आग लागली आहे. फोंडा अग्नीशमन दल आणि प्रशासकीय यंत्रणा ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

म्हादईप्रश्नी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्पष्टीकरण

विधानसभेच्या दुसर्‍या दिवशी प्रश्नोत्तर तासाला प्रारंभ झाल्यानंतर विरोधकांनी ‘म्हादईचे पाणी गोवा सरकारच्या संमतीने कर्नाटकला दिल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान हे बरोबर आहे कि चुकीचे ते सांगा ?’, असा प्रश्न करून सरकारला धारेवर धरले.

माझ्या सरकारचे यश सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

वर्ष २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आल्यानंतर डॉ. सावंत यांनी आजच्याच दिवशी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्या निमित्ताने . . .