राधानगरीसह अन्‍य धरणे भरल्‍याने कोल्‍हापुरात पंचगंगा नदी पुराच्‍या उंबरठ्यावर !

२४ जुलैपासून काही प्रमाणात उघडीप दिल्‍याने पंचगंगा नदीच्‍या पाण्‍याची पातळी ४० फूट ४ इंच इतकी नोंदवली गेली; मात्र राधानगरीसह अन्‍य धरणे भरल्‍याने त्‍यातून कधीही विसर्ग चालू होण्‍याची शक्‍यता असल्‍याने पंचगंगा नदी पुराच्‍या उंबरठ्यावर आहे.

अंधेरी (मुंबई) येथे दरड कोसळली

अंधेरी पूर्व येथील महाकाली मार्गावर २४ जुलैला मध्‍यरात्री दीड वाजता दरड कोसळली. ‘रामबाग’ या ७ मजली इमारतीच्‍या मागच्‍या बाजूला असलेल्‍या डोंगरावरील माती वेगाने खाली सरकू लागली.

श्री तुळजाभवानीदेवीच्‍या गहाळ अलंकारांविषयी चौकशी व्‍हावी !

देवीच्‍या दागिन्‍यांची मोजणी ‘ऑन कॅमेरा’ करावी, अशी मागणी करावी लागणे, हे लज्‍जास्‍पद आहे. मंदिरांचे सरकारीकरण झाल्‍यामुळेच देवीचे दागिने चोरीला जात आहेत. यासाठी मंदिरांचे विश्‍वस्‍त भक्‍तच हवेत !

रत्नागिरी जिल्ह्यात दरडप्रवण भागांतील १ सहस्र ७०१ जणांचे स्थलांतर

जिल्ह्यात मागील १५ दिवसांत मुसळधार पाऊस पडला आहे. पावसासमवेत वेगवान वार्‍यामुळे झाडे पडून घरा-गोठ्यांची हानीही झाली आहे. यंदा सर्वाधिक धोका भूस्खलनाचाच आहे.

लाभात असलेल्या बससेवा रत्नागिरी विभागाला चालवता येत नसतील, तर अन्य विभागांकडून चालवाव्यात !

दापोली-शिर्डी बससेवा ही बस निमआराम (सेमी) केल्यापासून पुणेपर्यंत चालवली जात आहे. दापोलीतून सुटणार्‍या परळी, शिर्डी, अक्कलकोट आणि विजापूर बससेवा बंद करण्याचा घाट !

अभिषेक पूजेवरील कर अल्‍प करावा, तसेच अभिषेक पूजेची संख्‍या वाढवण्‍यात यावी !

श्री तुळजाभवानी मातेच्‍या दर्शनासाठी प्रतिदिन सहस्रो भाविक येतात. देवीला अभिषेक पूजा हा भाविकांच्‍या आस्‍थेचा विषय आहेे; मात्र मंदिराच्‍या वाढीव करामुळे, तसेच अभिषेक संख्‍या अल्‍प केल्‍यामुळे सर्वसामान्‍य भाविक अभिषेक पूजेपासून वंचित रहात आहेत.

पुणे येथे पोलिसांच्या ५ सहस्र सदनिकांचे काम १५ वर्षे रखडले, पैशाच्या अपहाराप्रकरणी होणार अन्वेषण !

काम असेल चालू राहिले, तर हे काम काही वर्षांत पूर्ण होईल, असे वाटत नाही. या प्रकरणात पोलिसांच्या घरांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामध्ये पोलिसांचे पैसे अडकले आहेत.

पालटणार्‍या राजकीय स्थितीमुळे विधीमंडळाच्या समित्या रखडल्या ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

विधीमंडळात दिलेली आश्वासनांची पूर्तता करणे, अहवालांचा अभ्यास करणे आदी काम समित्यांकडून केले जाते. नवीन सरकार स्थापन होऊन १ वर्ष झाले, तरी अद्याप या समित्यांची स्थापना करण्यात आलेली नाही.

५ सहस्र शेतकर्‍यांसाठी लवकरच जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

विविध योजनांद्वारे शेतकर्‍यांना लाभ देण्यात येत आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती याेजनेच्या अंतर्गत नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० सहस्र रुपयांचा परतावा देण्यात येत आहे.

अतीवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना १० सहस्र रुपयांचे सानुग्रह अनुदान ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

ज्या ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे मृत्यू झाले आहेत त्या ठिकाणी मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपये तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत. पुराच्या ठिकाणी रोगराई पसरू नये; म्हणून स्वच्छता करण्यात येणार आहे.