Elephant Attack : सिंधुदुर्ग – मोर्ले गावात हत्तींकडून शेती आणि बागायती यांची मोठी हानी !

हत्तींचे भांडण आणि त्यांचा मोठ्या आवाजातील चित्कार यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण  पसरले होते. मोर्लेतील २ सहस्र केळी, २०० हून अधिक सुपारीची झाडे आणि ५० हून अधिक माड भूईसपाट केले.

Goa Funds Electoral Bonds : निवडणूक रोख्यांद्वारे गोव्यात भाजपला २७ कोटी, तर काँग्रेसला १ कोटी ८० लाख रुपये मिळाले !

१२ एप्रिल २०१९ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत विकण्यात आलेल्या निवडणूक रोख्यांच्या आधारावरून ही माहिती उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्रात शासनाकडून प्रथमच कीर्तन महोत्सवाचे आयोजन !

बीड जिल्ह्यात ३ दिवसीय ‘कीर्तन-समाज प्रबोधन’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी शासनाकडून २५ लाख रुपये इतके प्रावधान करण्यात आले आहे.

अभिनेते गोविंदा शिवसेनेच्या तिकिटावर मुंबईत लढण्याची चर्चा !

वर्ष २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर गोविंदा हे निवडून आले होते. त्यांनी ५ वेळा जिंकलेले भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव केला होता

जळण्याच्या घटनांमध्ये आता मुले आणि पुरुष यांचे प्रमाण अधिक !

अंगावर तेल सांडणे, गरम पाणी ओतून घेणे, घाईगडबडीमध्ये अंगावर गरम अन्न पडणे, विद्युतवाहक उपकरणांमध्ये हात घातल्याने विजेचा धक्का बसणे आदी दुर्घटना मुलांमध्ये वाढल्या आहेत. 

पालघर जिल्ह्यात कारागृह उभारण्यासाठी निधी संमत

पालघर जिल्ह्यात कारागृह उभारण्यासाठी ६३० कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. उमरोळी येथील जागा मध्यवर्ती कारागृहासाठी निश्चित करण्यात आली आहे.

पिंपरी (पुणे) येथील रेल्वेच्या सेवानिवृत्त ‘ट्रॅकमन’कडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती !

नोल्ला हे पुणे येथील खडकी रेल्वेस्थानकामधून ऑगस्ट २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांनी एप्रिल २००८ ते ऑगस्ट २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदी केली.

(म्हणे) ‘पुरणपो‍ळी होळीत न टाकता ती गरिबांना दान करा !’

हिंदु सणांच्याच दिवशी अशी शास्त्रविरोधी आवाहने का केली जातात ?

मुलाने बलात्कार केल्याचे सांगून वडिलांकडून तोतया पोलिसाने पैसे उकळले !

शीव कोळीवाडा येथील केंद्रीय शाळेतील एका शिक्षकाकडून मुलाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्याची धमकी देत सुमारे दीड लाख रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भारती विद्यापिठातील विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्याकडून गंभीर नोंद !

येथील भारती विद्यापिठातील वसतीगृहातील एका विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी गंभीरपणे नोंद घेतली.