‘हिंदु टास्क फोर्स’चे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल यांच्याकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण !

श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा

मंदिरे सरकारच्या कह्यात गेली, तर भाविकांनी श्रद्धेने मंदिरात अर्पण केलेल्या धनाचा वापर देवस्थान आणि धर्मकार्य यांसाठी खर्च न होता, तो मंत्र्यांच्या सोयीसुविधा, सामाजिक कामे, सरकारी कामे, अन्य धर्मियांच्या संस्था यांसाठी खर्च होतोे.

यापुढे कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमाला अनुमती दिल्यास विरोध करू ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

वर्ष १८१८ मध्ये कोरेगाव भीमा येथे झालेले युद्ध जातीय नव्हते. इंग्रजांनी केलेला हा शुद्ध अपप्रचार आहे. समकालीन संदर्भ आणि पुरावे पडताळले असता हे सिद्ध होते.

‘दया आवेदना’साठी घटना दुरुस्तीची आवश्यकता ! – उज्ज्वल निकम, अधिवक्ता

फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर करण्यात येणार्‍या दयेच्या आवेदनावर सुनावणीसाठी कालावधी निश्चित करणारी घटना दुरुस्ती करावी.

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन !

मागील ५० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात यशस्वी कारकीर्द व्यतीत करणारे ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे २१ जानेवारीच्या पहाटे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले.

गुळुंब (जिल्हा सातारा) येथे चित्रीकरण स्थळी दमदाटी करणार्‍या संभाजी ब्रिगेडच्या ९ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

सातारा पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन चित्रीकरण स्थळावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तरीही २० जानेवारी या दिवशी दुपारी संभाजी ब्रिगेडच्या ९ कार्यकर्त्यांनी चित्रीकरण करणारे व्यवस्थापक आणि कलाकार यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.

ह.भ.प. रवींद्र महाराज यांच्या अनुमतीमुळे हिंदु जनजागृती समितीकडून धर्मशिक्षणाचा प्रसार !

हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांच्याकडून धर्माचरण करण्याचे आवाहन

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील ‘हत्तीखाना’ लेणीचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांनी जातीने लक्ष घालून संवर्धन करावे !

येथील श्री योगेश्वरीदेवी मंदिराच्या उत्तरेस जोगाई सभामंडप लेणी ही ‘हत्तीखाना’ लेणी नावाने प्रसिद्ध आहे; मात्र सध्या त्या ठिकाणी मद्याच्या बाटल्या पडलेल्या दिसतात.

नाशिक येथे शिरस्त्राण न घालणार्‍या वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई !

शहरात अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन दुचाकीचालकांनी शिरस्त्राण (हेल्मेट) परिधान करणे पोलीस आयुक्तांनी सक्तीचे केले आहे. विविध माध्यमांतून वाहनधारकांचे शिरस्त्राणाविषयी प्रबोधन करण्यात आले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला !

‘अनिल देशमुख हेच सचिन वाझे यांनी डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत बार मालकांकडून वसूल केलेल्या खंडणीचे मुख्य लाभार्थी आहेत’, असा आरोप ईडीने केला आहे.