क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या नावाची कमान उभारलेल्या मैदानाला ‘झाशीच्या राणी’चे नाव देण्याची शिवसेनेची मागणी

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी या मैदानासाठी विकासनिधी देऊन क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या नावाची कमान उभारली होती. काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह भाजपकडून त्याला विरोध करण्यात आला होता.

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यावर विभागीय चौकशी चालू असतांनाही अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार !

सहसंचालक दर्जाच्या अधिकार्‍याकडे आयुक्तपदाचा अथवा अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार देऊ नये त्यामुळे कामावर नियंत्रण रहात नाही, असा संकेत आहे; मात्र सुपे यांची नियुक्ती करतांना हा संकेत पाळला गेलेला नाही.

उद्योजक प्रवीण राऊत यांच्या निकटवर्तियांच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालयाकडून धाड !

उद्योजक प्रवीण राऊत यांच्या ठाणे आणि रायगड येथील निकटवर्तियांच्या मालमत्तेवर २३ फेब्रुवारी या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाकडून धाड टाकण्यात आली आहे.

गोंदिया येथे खंडणीसाठी १७ वर्षीय मुलाची हत्या !

२२ फेब्रुवारी या दिवशी चेतन सकाळी मोठ्या आईच्या घरी रिसामा येथे जाण्यासाठी निघाला होता; मात्र रात्र झाली, तरी तो घरी न परतल्याने घरच्यांनी शोध चालू ठेवला, तसेच रात्री पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार केली.

‘डर्टी डझन’ असा उल्लेख करून किरीट सोमय्या यांनी केली महाविकास आघाडीतील १२ नेत्यांची नावे प्रसारित !

मुंबई, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ‘डर्टी डझन’  असा उल्लेख करून महाविकास आघाडीतील नेत्यांची नावे स्वत:च्या ‘ट्विटर’ खात्यावर प्रसारित केली आहेत. यामध्ये अनिल परब, संजय राऊत, सुजित पाटकर, भावना गवळी, आनंद आडसूळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या नावांचा समावेश आहे. … Read more

मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत बाँबस्फोट करणार्‍या आतंकवाद्यांकडून भूमी खरेदी करण्याचे कारण काय ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई येथे बाँबस्फोट करणार्‍यांसमवेत भूमी खरेदीचा व्यवहार का केला ? एखाद्या मंत्र्यांनी आतंकवाद्याकडून भूमी खरेदी करण्याचे कारण काय ?

अज्ञातांनी कागल (जिल्हा कोल्हापूर) येथील महावितरणचे कार्यालय पेटवले !

महावितरणच्या वीजनिर्मितीमध्ये साखर कारखान्यापेक्षाही मोठा घोटाळा आहे. तो लवकरच चव्हाट्यावर आणू. वीजनिर्मिती आस्थापनेत मंत्र्यांचे लागेबांधे आहेत.

नगर येथे दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकांची वाहतूक करणार्‍या टेम्पोला आग लागून प्रश्नपत्रिका भस्मसात् !

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची मध्यप्रदेशातील भोपाळ येथे छपाई करून, त्या पुणे येथील बोर्डाच्या कार्यालयात पोच करण्यासाठी टेम्पोमधून नेल्या जात होत्या.

मुंबईत सदनिकांची अनधिकृत विक्री दंड आकारून नियमित करण्यात येणार !

कब्जे हक्काने दिलेल्या भूमीवरील सदनिकांचे मूळ आणि नंतरच्या मालकांनी केलेले सर्व विक्री व्यवहार १ ते ५ टक्के दंड अन् हस्तांतर शुल्क आकारून नियमित करण्यात येणार आहेत, असा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

विविध मागण्यांसाठी राज्यातील वैद्यकीय सेवेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी २ दिवसांच्या संपावर !

कर्मचार्‍यांची जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करावी, कर्मचार्‍यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, खासगीकरणाचे धोरण रहित करावे, अश्या मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.