राज ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यासाठी न्यायालयात याचिका !

मशिदींपुढे हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन, तसेच मशिदींवरील भोंगे उतरवण्याविषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत ‘इंडिया अगेंस्ट करप्शन’ या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही याचिका केली आहे.

राज्यातील ७६४ अनधिकृत शाळांची माहिती सरकारने त्वरित प्रसिद्ध करावी !

प्रशासनाने स्वतःहून अनधिकृत शाळांची सूची घोषित करून तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालक यांची हानी आणि मनस्ताप टळू शकतो !

बनावट आणि खोटे दाखले देणाऱ्या पुण्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई केव्हा ? – नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? महसूल विभाग स्वतःहून यामध्ये पुढाकार का घेत नाही ?

कोल्हापूर खंडपीठासंदर्भात मुख्य न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सकारात्मक चर्चा !

‘मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करावे यासाठी शासन सकारात्मक आहे’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीत सांगितले होते.

स्वीस टेलिफिल्ममध्ये भारतीय शेतकऱ्यांची खाद्यसंस्कृती, कुटुंब आचार, कला आणि सार्वजनिक व्यवहार यांचे चित्रण करण्यात येणार !

परदेशातील महिला येऊन विदर्भातील शेतकरी कुटुंबाची माहिती घेते; मात्र येथील लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांची अशी माहिती घेऊन तिचा जगात प्रचार करावा, असे कधीच का सुचले नाही ?

महाराष्ट्रात ७ वर्षांपासून गोवंश हत्याबंदी असूनही गाय-बैल यांची संख्या १५ लाखांनी घटली !

गोवंश हत्याबंदी कायदा करूनही पोलिसांनी त्याची कठोर कार्यवाही न केल्याने गोवंशियांची सर्रासपणे हत्या केली जाते. यामध्ये एका विशिष्ट समाजाचा लक्षणीय सहभाग असूनही पोलीस त्यांच्यावर कठोर कारवाई करत नाहीत. अशा पोलिसांना बडतर्फ करायला हवे !

पालखीचा पायी मार्ग आणि तळ यांची जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडून पहाणी

कोरोनाकाळातील दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पायी पालखी मार्गावरील विविध पालखी तळांची प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पहाणी केली.

भंडारा कारागृहात अधिक भाजी न दिल्याने धर्मांध बंदीवानाची हिंदूला मारहाण !

जिल्हा कारागृहात सकाळी जेवणाचे वाटप चालू असतांना एका धर्मांध बंदीवानाने प्रमाणापेक्षा अधिक भाजी मागितली. त्याने भाजी न देणाऱ्यास मारहाण केली. नंतर ४ बंदीवानांनी दुसऱ्या बंदीवानाला मारहाण केली.

राज्यात प्रतिवर्षी इयत्ता १० वीत सरासरी १२ टक्क्यांवर विद्यार्थी मराठीत होतात अनुत्तीर्ण !

मराठीत एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही, हे ध्येय शिक्षकांनी ठेवून प्रयत्न करावेत !

श्रीरामाचे नाव घेणे गुन्हा असेल, तर १४ वर्षे कारागृहात रहाण्यास सिद्ध ! – नवनीत राणा, खासदार

‘हनुमान चालिसा’चे पठण करणे आणि श्रीरामाचे नाव घेणे हा गुन्हा असेल अन् त्यासाठी सरकारने मला १४ दिवसांची शिक्षा दिली असेल, तर मी १४ दिवसच काय, तर १४ वर्षे कारागृहात रहाण्यास सिद्ध आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे.