पुरुषांनी उभे रहाण्याऐवजी बसून लघवी करणे लाभदायी ! – विदेशी तज्ज्ञ

प्राध्यापक डॉ. जेसी मिल्स म्हणाले की, ज्यांना दीर्घकाळ उभे रहाण्यात अडचण येते, अशा लोकांसाठी लघवी करण्यासाठी बसणे एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो.

भरतपूर (राजस्थान) येथे महाराज सूरजमल आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसवण्याच्या वादातून हिंसाचार

कुम्हेर चौकात महाराजा सूरजमल, बल्लारा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नगर चौकात भगवान परशुराम यांचा पुतळा बसवण्यात येणार होता.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा प्रविष्ट !

माझे आजोबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात केलेल्या खोट्या आरोपांमुळे सावरकरांची अपकीर्ती झाली आहे.

बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या निविदेच्या अटी आणि शर्ती २ सप्ताहांमध्ये निश्चित करू ! – महापालिका प्रशासन

या प्रकल्पामुळे वेताळ टेकडीवरील जैवविविधता धोक्यात येत असल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांनी त्याला विरोध केला आहे. विविध मार्गांनी आंदोलन करत हा प्रकल्प रहित करण्याची मागणीही केली जात आहे.

रत्नागिरी येथे १५ एप्रिल या दिवशी ‘हिंदु गर्जना मोर्चा’

आज बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याची आवश्यकता आहे. रोंहिग्यांची संख्या तर वाढतच आहे. ‘एन्.आर्.सी.’सारखा कायदा होणे आवश्यक आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत.

बागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध ! – पालकमंत्री उदय सामंत

गेल्या वर्षापेक्षा यावर्षीचे आंबा उत्पादन केवळ १२ ते १५ टक्के असल्याचे कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी सांगितले आहे. तसा अहवाल त्यांनी तात्काळ शासनाकडे सादर करावा.

लोटे येथे ह.भ.प. भगवान कोकरे महाराज यांच्या उपोषणाच्या कालावधीत गोशाळेतील ६ गायींचा मृत्यू

गायींच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे या गोशाळेतील गायींवर उपासमारीची वेळ आली आहे. गोशाळेचे रखडलेले अनुदान मिळावे, गोशाळेसाठी एम्.आय.डी.सी. विभागाकडून भाडेतत्त्वावर भूमी मिळावी, हे उपोषण चालू आहे.

कुपोषणावरील उपाययोजनांचा अहवाल राज्यपाल कार्यालयात ६ वर्षांपासून धूळ खात पडून !

राज्यात सर्व यंत्रणा हाताशी असूनही आणि प्रतिवर्षी आदिवासी समाजाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये व्यय होऊनही कुपोषणाची समस्या न सुटणे प्रशासनाला लज्जास्पद !

शासकीय कामकाजात मराठीच्या अधिकाधिक वापरासाठी राज्यशासन धोरण निश्‍चित करणार !

‘मराठी भाषा सल्लागार समिती’ची मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत ऑनलाईन बैठक पार पडली. यामध्ये मराठी भाषेचे संवर्धन आणि तिचा अधिकाधिक वापर करण्याविषयी सर्वंकष धोरण लवकरच घोषित करण्याचे निश्‍चित करण्यात आले.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सावरकरवाड्यात मांडली जाणार वीरगाथा !

तंत्रज्ञानाचा संपूर्ण वापर करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास नव्या पिढीला दाखवावा. भगूर या गावात प्रवेश करताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट समोर यावा, असे काम करण्याची सूचना या वेळी मुनगंटीवार यांनी अधिकार्‍यांना दिली.