(म्‍हणे) ‘सत्ताधारी पक्ष अशा घटनांना प्रोत्‍साहित करतो !’

कुणीतरी भ्रमणभाषवर काहीतरी संदेश पाठवला. तो चुकीचा असेल; पण त्‍यासाठी रस्‍त्‍यावर उतरून त्‍याला धार्मिक स्‍वरूप देणे, हे योग्‍य नाही. सत्ताधारी पक्ष या घटनांना प्रोत्‍साहित करतो, अशी टीका शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्‍या सरकारवर केली.

आरोग्‍य विज्ञान विद्यापिठात हरकती आल्‍यामुळे ९ सिनेट सदस्‍यांच्‍या नियुक्‍त्‍या रद्द !

विद्यापिठात असे होणे अशोभनीय आहे ! संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्‍यक आहे !

सोलापूर येथे श्री हिंगुलांबिकादेवीची प्रतिष्‍ठापना !

श्री. किशोर कटारे पुढे म्‍हणाले, ‘‘कर्नाटक येथे (कृष्‍णकंडीकेमध्‍ये) वेदोक्‍त पद्धतीने १६ कलांनी पूर्ण अशी नवी मूर्ती बनवण्‍यात आली आहे; मात्र तिचे मूळ स्‍वरूप कायम ठेवण्‍यात आले आहे.”

पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे मानांकन घसरले !

देशातील सर्वोकृष्‍ट शैक्षणिक संस्‍थांच्‍या क्रमवारीमध्‍ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे स्‍थान खाली घसरले आहे. सर्वच विद्यापीठ शैक्षणिक संस्‍थांच्‍या क्रमवारीत ३५ व्‍या स्‍थानावर घसरले आहे,

विकासाच्‍या नावाखाली होणारा वेताळ टेकडीचा र्‍हास थांबवा ! – मनसे कार्यकर्त्‍यांची मागणी

निसर्गाने समृद्ध असलेल्‍या वेताळ टेकडीचा विकासाच्‍या नावाखाली र्‍हास करून बालभारती ते पौड फाटा असा जो रस्‍ता होणार आहे त्‍यास महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असून असे प्रकल्‍प शासनाने राबवू नयेत, अशी विनंती मनसे कार्यकर्त्‍यांनी उपोषणाच्‍या वेळी केली.

राज्‍यातील १११ साखर कारखान्‍यांकडे १ सहस्र १९९ कोटी रुपयांची ‘एफ्.आर्.पी.’ रक्‍कम थकित !

यंदा राज्‍यात २१० साखर कारखान्‍यांनी १०५३.६६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्‍यापोटी शेतकर्‍यांना एकूण ३४ सहस्र ५४२ कोटी रुपयांचे रास्‍त आणि किफायतशीर दराचे (‘एफ्.आर्.पी.’) देणे होते. त्‍यांपैकी ३३ सहस्र २४३ कोटी रुपये दिले आहेत; मात्र अद्यापही ३.४७ टक्‍के म्‍हणजेच १ सहस्र १९९ कोटी रुपयांची रक्‍कम दिलेली नाही…

(म्हणे) ‘काहीही करून शासनाला महाराष्ट्रात दंगली हव्या आहेत !’ – आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस

औरंगजेबाचे समर्थन करणार्‍यांविषयी काही न बोलता सरकारवर गरळओक करणारे मुसलमानधार्जिणे आव्हाड !

लव्‍ह जिहाद्यांना तात्‍काळ फासावर लटकवावे, तसेच देशात तात्‍काळ ‘लव्‍ह जिहादविरोधी’ कायदा करावा !

देहलीमध्‍ये साक्षी आणि झारखंडमध्‍ये अनुराधा अशा अनेक हिंदु मुलींची हत्‍या करणार्‍या लव्‍ह जिहाद्यांना तात्‍काळ फासावर लटकवा. पुणे जिल्‍ह्यातील मंचर या गावात घडलेल्‍या अल्‍पवयीन हिंदु मुलीवरील भयावह अत्‍याचाराच्‍या निषेधार्थ ५ जून या दिवशी मंचर येथे झालेल्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनातील मागण्‍यांची शासनाने त्‍वरित नोंद घ्‍यावी..

चर्चगेट (मुंबई) येथील बलात्‍कार आणि हत्‍या प्रकरणाची उच्‍चस्‍तरीय चौकशी होणार !

चर्चगेट परिसरातील उच्‍च आणि तंत्र शिक्षण विभागाच्‍या अखत्‍यारितील सावित्रीबाई फुले वसतीगृहातील एका विद्यार्थीवर बलात्‍कार करून तिची हत्‍या झाल्‍याच्‍या प्रकरणाची सरकारकडून उच्‍चस्‍तरीय चौकशी घोषित करण्‍यात आली आहे.

तिरूपत्तूर (तमिळनाडू) येथे प्रेयसीशी झालेल्या भांडणातून तरुणाने केली रेल्वेच्या सिग्नल बॉक्सची हानी !

असे कृत्य करणार्‍याला कठोरातील कठोर शिक्षा केली पाहिजे !