दैनंदिन जीवनात जनतेला सामोरे जाव्या लागणाऱ्या दुष्प्रवृत्तींचे स्वरूप !

सध्या भ्रष्टाचारामुळे संपूर्ण समाजव्यवस्थाच कशी पोखरली गेली आहे ? हे कळण्यासाठी फारसे खोलात शिरायला नको. दैनंदिन जीवनात आपल्या सभोवताली घडणार्‍या पुढील घटनांचा विचार केला, तरी ते पुरेसे ठरेल.

वाहनाची देखभाल-दुरुस्ती विनामूल्य करायची असतांना अतिरिक्त कामे करून ग्राहकांची फसवणूक करणारे सर्व्हिसिंग सेंटर चालक

वाचकांनो, आपले वाहन सर्व्हिसिंगसाठी देतांना वाढीव अंदाजपत्रक अथवा अनावश्यक देखभाल-दुरुस्तीची भिती दाखवून लूट होत नाही ना, याची काळजी घ्या !