केरळमधील हिंदूंना संपवण्यासाठी कम्युनिस्ट, ख्रिस्ती आणि मुसलमान मोठ्या प्रमाणात कार्यरत

कासारगोड येथील अथिरा नावाच्या मुलीने तिच्या मुसलमान वर्गमित्र-मैत्रिणी यांच्या दबावाला बळी पडून धर्मांतर केल्यानंतर तिने परत हिंदु धर्मात ‘घरवापसी’ केली.

जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येक ३३ व्यक्तींच्या मागे एकाकडे परवानाधारी बंदूक

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत ३३ लाख ६९ सहस्र ४४४ जणांकडे बंदूक बाळगण्याचा परवाना आहे. यात उत्तरप्रदेशात सर्वाधिक म्हणजे १२ लाख ७७ सहस्र ९१४ जणांकडे परवाना असलेल्या बंदूका आहेत.

भोपाळमध्ये नगरसेवक आणि आमदार यांच्या घरांना काळे फासले

आदमपूर छावनी येथे पशूवधगृह बांधण्यात येणार आहे. याचा विरोध करण्यात येत आहे. काँग्रेसकडूनही याला विरोध केला जात आहे. तिच्याकडून हिंदुत्वनिष्ठ संघटनांना याविषयावर संघटित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भारतातील ६० टक्के गर्भपात असुरक्षित ! – जागतिक आरोग्य संघटना

गर्भपाताला कायदेशीर मान्यता असलेल्या जगभरातील अनेक देशांमध्ये सुरक्षित गर्भपाताचे प्रमाण अधिक आहे

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वाहनाच्या ताफ्याला अपघात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संरसंघचालक मोहन भागवत यांच्या वाहनांचा ताफा यमुना महामार्गावरून जात असतांना अचानक ताफ्यातील वाहने एकमेकांवर आदळली.

मेरठ (उत्तरप्रदेश)मध्ये नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारण्यात येणार

देहलीहून ९० किलोमीटर अंतरावर असणार्‍या उत्तरप्रदेशातील मेरठच्या सरधाना भागामध्ये नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधण्यात येत आहे. यासाठी येथे ५ एकर भूमी विकत्र घेण्यात आली आहे.

मटका प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक स्थापन करू ! – शासनाचे न्यायालयात आश्‍वासन

१० ऑक्टोबरपर्यंत विशेष चौकशी पथक स्थापन करून सर्व मटका जुगार प्रकरणांचा छडा लावला जाईल, असे आश्‍वासन महाअधिवक्त्यांनी शासनाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दिले. या प्रकरणातील पुढील सुनावणी १० ऑक्टोबरला होणार आहे.

ध्वनीप्रदूषणामुळे जंतरमंतरवर आंदोलन करण्यास बंदी ! – राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश

गेली अनेक वर्षे आंदोलन करण्यात येत असलेल्या देहलीतील जंतरमंतरवर यापुढे राष्ट्रीय हरित लवादाने घेतलेल्या निर्णयानुसार कोणत्याही संघटनेला वा राजकीय पक्षाला आंदोलन करता येणार नाही. हा आदेश तातडीने लागू झाला आहे.

गोव्यातील सर्व सरकारी खाती यापुढे प्लास्टिकचा वापर बंद करणार

गोव्यातील सर्व सरकारी खात्यांकडून यापुढे प्लास्टिकचा वापर बंद केला जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजीत मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना घोषित केले.

दार्जिलिंगमध्ये गोरखालॅण्डच्या समर्थकांकडून बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांना मारहाण

बंगालचे भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांना ५ ऑक्टोबरला येथे बेदम मारहाण करण्यात आली. घोष आणि त्यांच्या समर्थकांनी तत्काळ दार्जिलिंग सोडून जावे, यासाठी गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली.


Multi Language |Offline reading | PDF