सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विनीत जिंदल यांचा शिरच्छेद करण्याची धमकी !

हिंदुत्वनिष्ठांना धमकी मिळाल्यावर पोलीस संबंधितांना संरक्षण पुरवतात. असे संरक्षण पुरवण्यासह धमकी देणार्‍यांवर वचक बसेल, अशी कारवाई केल्यास हिंदूंना धमकावण्याचेच काय, तर त्यांच्याकडे डोळे वर करून बघण्याचे धर्मांधांचे धाडस होणार नाही !

अभिनेता रणवीर सिंह याला सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध यादव यांच्याकडून कायदेशीर नोटीस !

सामाजिक माध्यमांवर स्वत:ची नग्न छायाचित्रे प्रसारित केल्याच्या प्रकरणी नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिरुद्ध यादव यांनी अभिनेता रणवीर सिंह याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

‘ईडी’ने ‘चर्च ऑफ साऊथ इंडिया’च्या बिशपला कह्यात घेतले !

आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ‘चर्च ऑफ साऊथ इंडिया’च्या विविध ठिकाणांवर २५ जुलै या दिवशी धाडी टाकल्यानंतर आता चर्चचे बिशप धर्मराज रसलाम यांना कह्यात घेण्यात आले आहे.

तेलंगाणा येथील कु. ओम कुलकर्णी याला १० वीच्या परीक्षेत ९५.८० टक्के गुण !

आपल्या यशाविषयी कु. ओम म्हणाला, ‘‘मी प्रतिदिन शनीमंत्र म्हणत असे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या साधनेतील नामजप करणे, कापूर आणि अत्तर यांचे उपाय करणे यांमुळे मनाची एकाग्रता होण्यास पुष्कळ साहाय्य झाले.

उत्तरप्रदेशातील सामूहिक बलात्कार प्रकरणी माजी आमदाराच्या मुलाला पुणे येथून अटक !

उत्तरप्रदेशात एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारे समाजवादी पक्षाचे भदोहीचे माजी आमदार विजय मिश्रा यांचा मुलगा विष्णु मिश्रा यांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

बिजनौर (उत्तरप्रदेश) येेथील मजार तोडफोडीची आता ‘एन्.आय.ए.’ चौकशी करणार

बिजनौरच्या शेरकोट येथील जलाल शाहच्या मकबर्‍याची महंमद कमाल आणि त्याचा भाऊ महंमद आदिल यांनी तोडफोड केली होती.

जाहिद आणि अरमान यांनी नात आणि सूनबाई यांचे अपहरण केल्याचे सांगत वृद्ध हिंदूची साहाय्य करण्याची याचना !

विश्‍व हिंदु परिषदेच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने हा व्हिडिओ प्रसारित करत, ‘बिहार राज्य जिहाद्यांसाठी नंदनवन बनले असून हिंदूंसाठी नरक बनला आहे’, अशी टीका केली आहे.

राज्यसभेत गदारोळ घालणार्‍या १९ खासदारांचे एका आठड्यासाठी निलंबन !

केवळ निलंबन नको, तर त्यांच्याकडून अधिवेशनासाठीचा वेळ वाया घालवण्यावरून दंड वसूल केला पाहिजे. यासह त्यांना देण्यात येणारे वेतन आणि भत्ते काढून घेतले पाहिजेत !

दारुबंदी असलेल्या गुजरातमध्ये विषारी दारु प्यायल्याने २८ जणांचा मृत्यू

दारुबंदी असतांनाही दारु उपलब्ध होेते आणि ती पिऊन काही जणांचा मृत्यू होतो, हे पोलीस अन् प्रशासन यांना लज्जास्पद ! देशात कितीही कायदे आणि बंदी घातली, तर गुन्हे काही थांबत नाहीत. याला भ्रष्टाचार हेच मुख्य कारण आहे.

(म्हणे) ‘कॅथॉलिक मिशनरी तमिळनाडूच्या विकासाचे मुख्य कारण !’

गेल्या काही मासांपासून तमिळनाडूमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांची हिंदुविरोधी कारस्थाने चालू असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. ख्रिस्त्यांना सत्ताधार्‍यांचा छुपा पाठिंबा असल्याच्या हिंदुत्वनिष्ठांच्या आरोपातील सत्यता यातून लक्षात येते !