बूंदी (राजस्थान) येथील सरकारी शाळेत तिसरी भाषा म्हणून संस्कृत ऐवजी उर्दू शिकवण्यासाठी धर्मांधांची धमकी

‘वरून’ आदेश आल्यामुळे शाळेने संस्कृत शिकवणे केले बंद !
मुख्याध्यापिकेने भीतीपोटी पोलिसांत तक्रार करण्याचे टाळले !

भरतपूर (राजस्थान) येथील अवैध उत्खननाच्या विरोधात आत्मदहन करणारे संत विजय दास यांचे निधन

संतांच्या मृत्यूला राजस्थानमधील काँग्रेस सरकारच उत्तरदायी आहे. त्याने कितीही कठोर प्रायश्‍चित्त घेतले, तरी ते अल्पच आहे. आता जनतेनेच काँग्रेस सरकारला सत्तेवरून खाली खेचले पाहिजे !

‘बुंदेलखंड एक्सप्रेस वे’वर उद्घाटनाच्या ५ व्या दिवशीच खड्डे पडले !

कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ‘बुंदेलखंड एक्सप्रेस वे’वर उद्घाटनाच्या ५ दिवसांतच पावसामुळे खड्डे पडले आहेत. १६ जुलै या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते.

मध्यप्रदेशमध्ये इंदूर, उज्जैन आणि ग्वाल्हेर येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

इंदूर येथे पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. संतोष शर्मा आणि सौ. शोभा शर्मा यांनी सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

सोनिया गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसकडून ईडीच्या कार्यालयांवर मोर्चा !

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने मागील काही दिवसांपासून कारवाई चालू केली आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने २१ जुलै या दिवशी मुंबई आणि नागपूर येथील संचालनालयाच्या कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला.

बँकेने अयोग्य वर्तन केल्यास ग्राहकांना रिझर्व्ह बँकेला संपर्क साधण्याचा अधिकार !

तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक असाल, त्या बँकेच्या कर्मचार्‍यांच्या तक्रारीसाठी तुम्ही बँकेचा तक्रार निवारण क्रमांक घेऊन तक्रार करू शकता. बँकेच्या ‘टोल फ्री’ क्रमांकावरही समस्या सांगू शकता. काही बँकांकडून ऑनलाईन तक्रार प्रविष्ट करण्याची सुविधाही दिलेली असते.

कर्णावती (गुजरात) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयालवर लिहिले ‘हज हाऊस’ !

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी येथील काँग्रेसच्या कार्यालयावर ‘हज हाऊस’ असे लिहिले, तसेच येथील काँग्रेसच्या नेत्यांच्या छायाचित्रांना काळे फासले.

झारखंडमध्ये गोतस्करांकडून पोलिसांना ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न

उद्दाम गोतस्करांची आता पोलिसांच्या अंगावरच गाडी घालून त्यांना जिवे मारण्यापर्यंत मजल गेली आहे ! गोतस्कारांना पोलीस आणि कायदा यांचे जराही भय नसणे, हे लज्जास्पद !

(म्हणे) ‘गोव्यात राष्ट्रीय ख्रिश्‍चन विद्यापिठाची स्थापना करा !’ – तृणमूल काँग्रेसचे खासदार लुईझिन फालेरो यांची राज्यसभेत मागणी

गोव्यात ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराचा इतिहास पाहिल्यास हे विद्यापीठही हिंदूंच्या धर्मांतराचे केंद्र बनणार नाही कशावरून ?

नेहरू-गांधी यांच्या नावावर आम्ही ‘३-४ पिढ्या बसून खातील’ एवढे कमावले !

काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या ७५ वर्षांमध्ये देशाला किती प्रमाणात लुबाडले, हे लक्षात येते ! या पापांमुळेच काँग्रेस देशाच्या राजकारणातून लवकरच पुसली जाईल, हे सुनिश्‍चित आहे !