राममंदिराच्या प्रश्‍नावर मध्यस्थ होण्यास मी सिद्ध आहे ! – श्री श्री रविशंकर

राममंदिराचा प्रश्‍न सोडवण्यास साहाय्य करण्यासाठी काही लोक माझ्याकडे आले होते. सर्व जण सकारात्मकतेने आले होते. त्यांना ही समस्या सुटावी, अशी अपेक्षा आहे.

केवळ अर्धा लिटर पाण्याद्वारेच उज्जैनच्या श्री महाकालेश्‍वर मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक करा ! – सर्वोच्च न्यायालय

हिंदूंच्या पवित्र १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्‍वर मंदिरातील शिवलिंगावर केवळ अर्धा लिटर आर्.ओ. पाण्याने (प्रक्रियेने शुद्ध केलेल्या पाण्याने) अभिषेक करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

रस्त्यांतील खड्ड्यांमुळे भारतात दिवसाला ६ जण जीव गमावतात !

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे देशात वर्ष २०१६ मध्ये एकूण २ सहस्र ४२४ जणांना जीव गमवावा लागला आहे. म्हणजे खड्ड्यांंमुळे दिवसाला किमान ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सनबर्न होऊ न देण्याचे महापौर नितीन काळजे यांचे आश्‍वासन

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत हा कार्यक्रम होऊ देणार नाही. आम्हालाही हा कार्यक्रम नकोच आहे, असे सांगत महापौर श्री. नितीन काळजे यांनी सनबर्न फेस्टिव्हलला विरोध दर्शवला आहे.

उज्जैनच्या महाकालेश्‍वर मंदिरातील शिवलिंग पूजेसंदर्भात धर्माचार्यांनी निर्णय घ्यावा, असा आदेश न्यायालयाकडून अपेक्षित ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

वर्ष १९९७ मध्ये उत्तरप्रदेश सरकारने काशी विश्‍वेश्‍वर मंदिराचे अधिग्रहण केल्यानंतर मंदिराच्या व्यावहारिक सूत्रांविषयी न्यायालय हस्तक्षेप करू शकते; मात्र पूजा-अर्चा यांमध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असे स्पष्ट केले होते.

गौरी लंकेश गोळीमुळे बळी न पडता दारूमुळे बळी पडली असती, तर ती सिंगल कॉलम वार्ता झाली असती !

पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली आहे. खरोखर हे धक्कादायक आहे. या नृशंस कृत्याचा धिक्कार केलाच पाहिजे. ही हत्या कोणीही केलेली असो, त्याचे समर्थन करणे शक्यच नाही.

हिंदुस्थान हा हिंदूंचा देश असला, तरी येथे अन्य धर्मीय राहू शकतात ! – डॉ. मोहन भागवत

जसा जर्मनी जर्मनांचा, ब्रिटन इंग्रजांचा, अमेरिका अमेरिकनांचा, तसा हिंदुस्थान हा हिंदूंचा देश आहे; पण याचा अर्थ असा नव्हे की, येथे अन्य धर्मीय राहू शकत नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

देशी गोवंशियांच्या रक्षणासाठी विश्‍वमाता गोमाता नाट्याचे आयोजन

किन्निगोळी (कर्नाटक) येथील श्री शक्तीदर्शन योगाश्रमाच्या वतीने प.पू. योगाचार्य देवबाबा यांच्या आशीर्वादाने देशी गायींचे रक्षण आणि संवर्धन व्हावे या उद्देशाने विश्‍वमाता गोमाता या हिंदी नृत्यनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अंबरनाथ येथील भूमी अभिलेख कार्यालयातील १ सहस्र रुपयांची लाच घेणारे लिपीक आणि शिपाई कह्यात

तक्रारदाराच्या चर्चच्या जागेच्या मोजणीची प्रत देण्यासाठी अंबरनाथ येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई रामदास शंकर टेंबे आणि छाननी लिपीक प्रकाश पांडुरंग भला यांना १ सहस्र रुपयांची लाच घेतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले.

राजस्थानमध्ये लग्नाच्या गाडीतून गोतस्करी

राजस्थानच्या मेवात येथे पोलिसांनी लग्नाच्या वाहनातून गोतस्करीचा प्रकार उघड केला आहे. या तस्करांनी एयूव्ही गाडीमध्ये ४ गायींना भरले होते आणि वरून तिला लग्नाच्या गाडीसारखे फुलांनी सजवले होते.


Multi Language |Offline reading | PDF