अंबरनाथ येथील भूमी अभिलेख कार्यालयातील १ सहस्र रुपयांची लाच घेणारे लिपीक आणि शिपाई कह्यात

तक्रारदाराच्या चर्चच्या जागेच्या मोजणीची प्रत देण्यासाठी अंबरनाथ येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई रामदास शंकर टेंबे आणि छाननी लिपीक प्रकाश पांडुरंग भला यांना १ सहस्र रुपयांची लाच घेतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले.

राजस्थानमध्ये लग्नाच्या गाडीतून गोतस्करी

राजस्थानच्या मेवात येथे पोलिसांनी लग्नाच्या वाहनातून गोतस्करीचा प्रकार उघड केला आहे. या तस्करांनी एयूव्ही गाडीमध्ये ४ गायींना भरले होते आणि वरून तिला लग्नाच्या गाडीसारखे फुलांनी सजवले होते.

उत्तरप्रदेश सरकारकडून वृंदावन आणि बरसाना तीर्थस्थळ घोषित 

मथुरेतील वृंदावन आणि बरसाना यांना उत्तरप्रदेश सरकारकडून तीर्थस्थळांचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

आधारकार्ड नाही म्हणून रेशनचे धान्य देणे बंद करू नका ! – केंद्र सरकारचा राज्यांना आदेश

लाभार्थींकडे आधारकार्ड नाही किंवा त्यांनी ते स्वतःच्या रेशनकार्डला जोडले नाही, या कारणामुळे कोणालाही रेशनवरील धान्य आणि अन्य वस्तू देण्याचे नाकारू नये, असा आदेश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिला आहे.

राजस्थानमध्ये ५ जातींना अन्य मागासवर्गियांमध्ये ५ टक्के आरक्षण देणारे विधेयक संमत

राजस्थानच्या विधानसभेने राजस्थान मागासवर्ग विधेयक, २०१७ संमत केले. यामुळे आता राज्यातील अन्य मागासवर्गियांचे आरक्षण २१ वरून २६ टक्के झाले आहे, तसेच राज्यातील एकूण आरक्षण ५४ टक्के झाले आहे.

मांस व्यापारी मोईन कुरेशी याने सीबीआयच्या प्रमुखाला लाच देण्यासाठी ५ कोटी रुपये घेतल्याची उद्योगपतीची तक्रार

उद्योगपती प्रदीप कोनेरू याने केलेल्या तक्रारीवरून अंमलबजावणी संचलनालयाने मांस व्यापारी मोईन कुरेशी याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. कोनेरू यांनी म्हटले आहे की, कुरेशी याने सीबीआयचे तत्कालीन संचालक ए.पी. सिंह यांना लाच देण्यासाठी ५ कोटी रुपये घेतले होते.

ब्लू व्हेल खेळ एक राष्ट्रीय समस्या असून याविषयी दूरचित्रवाहिन्यांवरून जागरूकता करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला आदेश

ब्लू व्हेल खेळ ही एक राष्ट्रीय समस्या आहे. दूरचित्रवाहिन्यांवरून महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या वेळी याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी एक माहितीपट बनवावा आणि तो प्रसारित करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने या खेळावर बंदी घालण्यासाठी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना दिला.

आग्रा येथे विदेशी पर्यटकांना झालेल्या मारहाणीची केंद्र सरकारकडून गंभीर दखल !

फतेहपूर सिकरी येथे २२ ऑक्टोबरला स्वित्झर्लंडमधील जोडप्याला मारहाण झाल्याच्या प्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी योगी सरकारकडून अहवाल मागवला आहे. या मारहाणीच्या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. यातील ३ आरोपी अल्पवयीन आहेत.

हॉटेलबाहेर अर्धा घंटा रांगेत उभे राहू शकतो, मग ५२ सेकंदांच्या राष्ट्रगीतासाठी का उभे रहाता येत नाही ? – क्रिकेटपटू गौतम गंभीर

आपण एखाद्या क्लबच्या बाहेर २० मिनिटे वाट पहात उभे राहू शकतो, आवडत्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी अर्धा घंटा रांगेत उभे राहू शकतो.

छत्तीसगडच्या मंत्र्याकडे खंडणी मागणारे पत्रकार विनोद वर्मा यांना अटक

छत्तीसगड येथील भाजप नेते तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री राजेश कुमार यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरून छत्तीसगड पोलिसांनी ज्येष्ठ पत्रकार विनोद वर्मा यांना २७ ऑक्टोबर या दिवशी सकाळी त्यांच्या निवासस्थानातून अटक केली.


Multi Language |Offline reading | PDF