अधिवक्ता विष्णु शंकर जैन आता केंद्रशासनाचे अधिवक्ता !

आता ते विविध प्रकरणांत केंद्रशासनाजी बाजू मांडणार आहेत. अधिवक्ता जैन सध्या ज्ञानवापी प्रकरणात हिंदु पक्षाकडून बाजू मांडत आहेत. 

काँग्रेसने भारताची फाळणी केल्याने ‘भारत जोडो’ यात्रा पाकिस्तानातून चालू करावी !  

काँग्रेसकडून ‘भारत जोडो’ या यात्रेला ७ सप्टेंबरपासून  तमिळनाडूच्या कन्याकुमारीतून प्रारंभ करण्यात आली आहे. यावर आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी टीका केली आहे.

पाककडून युद्धबंदीचे उल्लंघन करत आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार

पाक विश्‍वासू नाही, हे वेळोवेळी लक्षात आलेले आहे. त्यामुळे अशा युद्धबंदीचे तो पालन करील यांची शक्यता अल्पच आहे. हे लक्षात घेऊन भारताने नेहमीच सतर्क असणे आवश्यक !

देहलीतील गोविंदपुरी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक आणि ठाणा प्रमुख यांच्यात हाणामारी !

आपापसांत भांडणारे पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?

गोमांस खात असल्यामुळे अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महाकालेश्‍वर मंदिरात जाण्यापासून रोखले !

हिंदू आता जागृत झाल्यामुळे ते आता अशा प्रकारे वैध मार्गाने विरोध करून त्यांच्या धार्मिक भावनांची नोंद घेण्यास भाग पाडत आहेत, हे कौतुकास्पद आहे !

जळगावमध्ये गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण

निरपराध हिंदूंना अमानुष मारहाण करून मर्दुमकी गाजवणारे पोलीस अन्य पंथियांसमोर गुडघे टेकतात, हे लक्षात घ्या ! अशा पोलिसांच्या विरोधात हिंदूंनी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करून त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा घेणे आवश्यक !

राजकीय पक्षांकडून होणार्‍या धार्मिक चिन्हे आणि नावे यांच्या वापरावर बंदीची मागणी

राज्यघटनेचा संदर्भ देत रिझवी यांनी ‘धर्माच्या आधारे मतदारांना आकर्षित करणे अवैध आहे’, असे याचिकेत म्हटले आहे. याचिकादाराच्या वतीने अधिवक्ता गौरव भाटिया यांनी न्यायालयात बाजू मांडली.

अंकिता सिंहला मारणार्‍या आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या जिहाद्यांना कठोर शिक्षा करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

धनबाद (झारखंड) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’चे आयोजन

गुरु मडीवाळेश्वर मठाचे बसवसिद्धलिंग स्वामीजी यांची आत्महत्या !

या प्रकरणी स्वामीजींनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, ‘मी काहीही चुकीचे केलेले नाही. माझ्या मृत्यूचे कारण मीच आहे. कुणाचेही अन्वेषण करू नका.

हणजुणे येथील वादग्रस्त ‘कर्लिस’ उपाहारगृहाजवळील बंद खोलीत कुजलेला मृतदेह आढळला !

हणजुणे येथील वादग्रस्त ‘कर्लिस’ उपाहारगृह पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहे. या उपाहारगृहानजीक काही अंतरावर असलेल्या एका बंद खोलीत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला आहे. यामुळे पुन्हा संशयाचे वादळ घोंगावत आहे.