कर्नाटकमधील हिजाब बंदीचे प्रकरण आता सरन्यायाधिशांकडे !

कर्नाटक उच्च न्यायालयाने ‘सरकारी प्री-युनिव्हर्सिटी गर्ल्स कॉलेज, उडुपी’च्या काही मुसलमान विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती.

देहली दंगलीच्या वेळी गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍याची हत्या करणार्‍या मुसलमानाला अटक

त्याच्यावर यापूर्वीच अपहरण आणि बलात्कार असे गुन्हे आहेत. या प्रकरणी त्याला यापूर्वी अटकही करण्यात आली होती.

एखाद्या महिलेने उत्तान कपडे घातले, तरीसुद्धा पुरुषांना गैरवर्तवणुकीचा परवाना मिळत नाही ! – केरळ उच्च न्यायालय

लैंगिक छळ प्रकरणात लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सिविक चंद्रन् यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला आव्हान देणार्‍या याचिका निकाली काढतांना उच्च न्यायालयाने वरील मत व्यक्त केले.

पंजाबमध्ये बंदीवानांना त्यांच्या जोडीदाराशी एकांतात भेटता येणार !

पंजाब सरकारने सांगितले की, ही सुविधा कुख्यात गुंड आणि लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित खटल्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या दोषींना मिळणार नाही.

आम आदमी पक्षाचे नेते गोपाल इटालिया यांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे प्रकरण

गुरुग्राम (हरियाणा) येथे जमावाकडून मशिदीवर आक्रमण

या प्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी १२ लोकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. आक्रमणकर्त्यांचा हेतू काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

श्री क्षेत्र कुर्ली-आप्पाचीवाडी (जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेस प्रारंभ !

महाराष्ट्र, कर्नाटक यांसह लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कुर्ली-आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेस ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला.

प्रत्येक वार्ताहराने बातमीतून चळवळ कशी निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करावेत ! – श्री. नागेश गाडे, समूह संपादक, सनातन प्रभात

प्रत्येक वार्ताहराने आपण केलेल्या बातमीतून पुढे चळवळ कशी निर्माण होईल ?, यादृष्टीने प्रयत्न करायला हवे. यासह केवळ बातमीसाठी बातमी न करता बातमीच्या माध्यमातून आपली साधना कशी होईल ?, या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत.

हिंदुद्वेषी विज्ञापनाच्‍या विरोधात  #AamirKhan_Insults_HinduDharma  हा ट्‍विटरवर ट्रेंड पहिल्‍या क्रमांकावर !

यू-ट्यूबवर प्रसारित झालेल्‍या ‘एयू स्‍मॉल फायनान्‍स बँके’च्‍या विज्ञापनामध्‍ये हिंदु धर्मातील परंपरेचा अवमान करण्‍यात आला आहे. यामध्‍ये विवाहानंतर घरजावई बनवलेला वर (आमीर खान) आणि वधू (कियारा आडवाणी) यांना गृहप्रवेश करतांना दाखवले आहे.

प.पू. डॉ. मोहन भागवत यांच्‍याविषयी खोटे वृत्त दिल्‍याप्रकरणी दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक आणि मालक यांना अटक करावी !

प.पू. डॉ. मोहन भागवत यांनी केलेल्‍या भाषणानंतर दैनिक ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राने जातीजातींत तेढ निर्माण करणारे वृत्त प्रकाशित केले आहे.