भारतात प्रतिवर्षी ४५ सहस्र महिलांचा प्रसुतीच्या वेळी मृत्यू

भारतात प्रतिवर्षी ४५ सहस्र महिलांचा प्रसुतीच्या वेळी मृत्यू होतो. प्रसुतीच्या वेळी उद्भवणार्‍या आरोग्याच्या समस्यांमुळे महिलांना प्राण गमवावे लागले आहेत, असे ‘फेडरेशन ऑफ ऑब्स्टेरिक अ‍ॅण्ड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’ने आयोजित केलेल्या परिषदेत नमूद करण्यात आले.

अयोध्येत राममंदिर आणि लक्ष्मणपुरी येथे मशीद बांधा ! – शिया वक्फ बोर्ड

शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी रामजन्मभूमीवर राममंदिर आणि लक्ष्मणपुरी येथे मशीद बांधावी, असा प्रस्ताव मांडला आहे.

निर्मात्यांनी ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाचा दिनांक पुढे ढकलला

वादग्रस्त ‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दिनांक पुढे ढकलण्याचा निर्णय निर्मात्यांकडून घेण्यात आला. यापूर्वी हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता.

करणी सेनेच्या अध्यक्षांना पाकमधून ठार मारण्याची धमकी

‘पद्मावती’ चित्रपटाला विरोध करणारे करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्रसिंह कलवी यांना पाकिस्तानमधून दूरभाषवरून ठार मारण्याची धमकी देण्यात आली.

श्रीनगर येथील पोलीस ठाण्यावरील आक्रमणाचे दायित्व इसिसने स्वीकारले 

१७ नोव्हेंबरला श्रीनगरच्या जाकूरा येथे आतंकवाद्यांनी पोलीस ठाण्यावर केलेल्या आक्रमणाचे दायित्व इसिसने स्वीकारले. इसिसने त्याच्या ‘एहमाक’ या वृत्तसंस्थेच्या संकेतस्थळावर एक ‘पोस्ट’ टाकून त्यात हे स्पष्ट केले.

नोटाबंदीची कार्यवाही करतांना घोडचूक ! – नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ रिचर्ड थेलर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नोटाबंदी लागू करण्याची संकल्पना चांगली होती; पण त्याची कार्यवाही करतांना घोडचूक करण्यात आली, असे मत अमेरिकेतील नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ रिचर्ड थेलर यांनी व्यक्त केलेे.

बांगलादेशातील हिंदूंची लोकसंख्या ५ टक्क्यांपेक्षा अल्प होण्याच्या मार्गावर

वर्ष १९०१ मध्ये तेव्हाचा पूर्व बंगाल म्हणजेच आजच्या बांगलादेशमधील हिंदूंची लोकसंख्या ३३ टक्के होती. ती आज केवळ ८.५ टक्के उरली आहे. तेथील हिंदूंवर धर्मांधांकडून होणारे अत्याचार असेच चालू राहिले

देहली येथील महाविद्यालयाच्या नावात पालट करून ‘वन्दे मातरम्’ ठेवले

येथील ‘दयालसिंह इव्हिनिंग कॉलेज’ या महाविद्यालयाचे नाव पालटून ‘वन्दे मातरम्’ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या प्रशासकीय मंडळाने यासंदर्भात एक प्रस्ताव संमत केला; मात्र सकाळ आणि सायंकालीन महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी याला विरोध केला.

हिंदु धर्म स्वीकारून मुसलमान तरुणाचा हिंदु पद्धतीने हिंदु तरुणीशी विवाह

मध्यप्रदेशातील एका २४ वर्षांच्या मुसलमान सैनिकाने एप्रिल २०१६ मध्ये आर्य समाज मंदिरामध्ये एका हिंदु तरुणीशी हिंदु पद्धतीने विवाह केला. त्या सैनिकाने हिंदु धर्माचा स्वीकार केला; मात्र या विवाहाला तरुणीच्या कुटुंबियांनी विरोध केला.

रुग्णांना औषध घेण्यासमवेत हनुमान चालीसा म्हणण्यास आणि मंदिरात जाण्यास सांगणारे भरतपूर (राजस्थान) येथील आधुनिक वैद्य दिनेश शर्मा !

येथील आधुनिक वैद्य दिनेश शर्मा (वय ६९ वर्षे) यांनी त्यांच्याकडे तपासणी येणार्‍या रुग्णाला औषधांसह ‘प्रतिदिन हनुमान चालीसा वाचा आणि लवकर बरे व्हायचे असेल, तर प्रतिदिन मंदिरात जा!’ अशा आशयाचे ‘प्रिस्क्रिप्शन’ दिल्याचे सामाजिक माध्यमावरून प्रसारित झाले आहे. एका रुग्णाने ते प्रसारित केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now