सांताक्रूझ (मुंबई) येथे धर्मांधाकडून हिंदु प्रेयसीवर भररस्त्यात चाकूने आक्रमण !

लव्ह जिहादवर आधारित ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला विरोध करू पहाणार्‍यांनी या घटनेविषयीही बोलावे !

राजस्थानात सैन्याचे ‘मिग २१’ विमान कोसळले : २ महिलांचा मृत्यू

विक्रम होईल इतके ‘मिग २१’विमानांचे अपघात झाले असतांना ही विमाने बाद का करण्यात येत नाहीत ? अशी सदोष विमाने असणे, हे सक्षम युद्धसज्जेतेचे लक्षण कसे असू शकते ?

(म्हणे) ‘निवडणुकीत धार्मिक प्रश्नाच्या आधारे वातावरण निर्माण करणे अयोग्य !’ – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

देशाचे पंतप्रधान धर्माचा आधार घेऊन घोषणा देतात, याचे आश्चर्य वाटते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

अतिक अहमद याची फरार पत्नी शाईस्ता परवीन ‘माफिया’ घोषित !

इतके दिवस एका महिला माफियाला पकडू न शकणे पोलिसांना लज्जास्पद !

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात २ सहस्र ८९० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई !

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात ८८ लाख रुपयांची रोख रक्कम, मद्य, रसायन, गांजा असा ४ कोटी ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बंगालमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी !

तृणमूल काँग्रेस सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात देशभरातील धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंनी आवाज उठवणे आवश्यक आहे. हा हिंदूंवरील अत्याचारला दडपण्याचाच हुकूमशाही प्रकार आहे.

पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत अध्यक्षपदी रहाणार ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सुप्रिया सुळे यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याचा विचार आताच करता येणार नाही. पक्ष आणि कार्यकर्ते यांच्यासाठी मी निवृत्ती मागे घेतली. पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत मीच अध्यक्षपदी रहाणार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

गोव्यात श्रीराम सेनेला विरोध करणारा भाजप हनुमान चालिसाचे पठण करतो ! – कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार

गोव्यामध्ये भाजपचे सरकार असूनही तेथे श्रीराम सेनेला प्रवेश नाही. श्रीराम सेनेला तेथे कार्य करता येत नाही; मात्र तेच भाजपवाले कर्नाटकात हनुमान चालिसा पठण करत आहेत, अशी टीका कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी केली.

‘द केरल स्टोरी’ला विरोध करणे चुकीचे ! – अभिनेत्री शबाना आझमी

नुकताच प्रदर्शित झालेला ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला विरोध करणे चुकीचे आहे, असे मत अभिनेत्री शबाना आझमी यांनी ट्वीट करून व्यक्त केले.

लडाखमध्ये बसवण्यात आले जगातील पहिले ‘लाय फाय’ नेटवर्क !

लडाख येथील डोंगराळ क्षेत्रात संपर्कासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ‘लाय फाय’ असे याचे नाव आहे. याची यशस्वी चाचणी करण्यात आली. ‘लाय फाय’, म्हणजेच ‘लाईफ फिडॅलिटी टेक्नोलॉजी’ असे याचे नाव आहे.