CPI(M) MANIFESTO : माकपच्या घोषणापत्रात भारताने अण्वस्त्रे नष्ट करून देशाला शक्तीहीन करण्याचे घातक आश्‍वासन !

अशा प्रकारचे राष्ट्राघातकी आश्‍वासन देऊन जनतेकडून मते मागणार्‍या पक्षावर बंदी घालून त्याच्या नेत्यांना कारागृहात डांबवण्याची मागणी जनतेने आतापर्यंत करणे आवश्यक होते. अशी मागणी न होणे हे भारतियांना लज्जास्पदच म्हणावे लागेल !

CRPF Fake Track Suit : बनावट ट्रॅक सूट विकल्याच्या प्रकरणी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकार्‍याला पदावरून हटवले !

केवळ पदावरून हटवून काय उपयोग ? अशांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !

शिरपूर (जिल्हा जळगाव) येथे मुसलमान तरुणीकडून ३ हिंदु तरुणींचे वशीकरण करण्याचा प्रयत्न फसला !

हिंदूंवर आघात करण्यात आता धर्मांध मुसलमान मुलीही सरसावल्या आहेत ! अशांवर आता अंधश्रद्धानिर्मूलन कायद्यांर्तगत कारवाई करण्याची धमक पोलीस दाखवतील का ? हिंदु तरुणींच्या मागे ठामपणे उभे रहाणार्‍या सर्व हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन !

पुणे येथे मतदार जागृतीच्या फलकावर ‘इन्कलाब झिंदाबाद’, ‘नोटा’ असे लिहले !

भारतात राबवण्यात येणारी लोकशाही प्रणाली साम्यवाद्यांना मान्य नाही. ज्या प्रमाणे जे.एन्.यू. आणि अन्य शैक्षणिक संस्था यांमध्ये साम्यवाद्यांचा शिरकाव झाला आहे, तसा तो ‘गोखले संस्थे’तही झाला नाही ना, याचा शोध घेणे आवश्यक !

आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय !

यआयटी गुवाहाटीचा २० वर्षीय विद्यार्थी त्याच्या वसतिगृहात मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. कुटुंबियांनी आरोप केला की, त्यांच्या मुलावर रॅगिंग (छळ) केल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली.

अयोध्येतील श्रीराममंदिरात माजी सनदी अधिकार्‍याने दिले सोन्याचे रामचरितमानस !

अयोध्या येथील श्रीराममंदिरासाठी मध्यप्रदेशातील माजी सनदी अधिकारी सुब्रह्मण्यम् लक्ष्मी नारायण यांनी सोन्याचे रामचरितमानस भेट दिले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी या रामचरितमानसची मंदिरातील गर्भगृहात स्थापना करण्यात आली.

PM Modi On Heatwave : पंतप्रधान मोदी यांनी घेतली उष्णतेच्या परिस्थितीविषयी आढावा बैठक !

पंतप्रधान मोदी यांनी केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील सर्व सरकारी संस्था यांना एकत्रितपणे काम करण्यास सांगितले.

बेंगळुरूतील बाँबस्फोटाच्या प्रकरणी २ जिहाद्यांना अटक

बेंगळुरू येथील रामेश्‍वरम् कॅफे बँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) कोलकाता येथून अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजिब या दोघांना अटक केली आहे.

Weather Alert : देशातील १४ राज्यांमध्ये पावसाची शक्यता !

कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यांच्या किनारी भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

Haryana School Bus Accident : महेंद्रगड (हरियाणा) येथील शाळेच्या बसच्या अपघाताच्या प्रकरणी मुख्याध्यापिकेसह ३ जणांना अटक

येथे ११ एप्रिल या दिवशी कनिना गावाजवळ खासगी शाळेच्या बसला झालेल्या अपघात ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर २० विद्यार्थी घायाळ झाले होते.