देहली येथील सीमेवरील शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी एका तरुणाची अमानुष हत्या !

कुराण, श्री गुरु ग्रंथ साहिब आदींचा अवमान झाल्यावर थेट कायदा हातात घेतला जातो, तर हिंदूंच्या धर्मग्रंथांचा, देवतांचा अवमान होऊनही सारे कसे शांत असते ! हिंदूंनी वैध मार्गाने जरी विरोध करण्याचा प्रयत्न केला, तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हा विरोध दाबला जातो !

गोवा १० वर्षांनंतर सर्वाधिक ‘फॉरेन्सिक सायन्स’ (न्यायवैद्यक) शास्त्रज्ञ निर्माण करणारे केंद्र बनेल ! – अमित शहा

धारबांदोडा येथे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापिठाशी (एन्.एफ्.एस्.यू.) संलग्न महाविद्यालयाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते.

दरभंगा (बिहार) येथे मंदिराच्या पुजार्‍याची गोळ्या झाडून हत्या !

‘बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने वाटचाल करत आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

पंजाब, आसाम आणि बंगाल राज्यांत सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र १५ कि.मी. वरून ५० कि.मी. पर्यंत वाढवले !

अमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रपुरवठा रोखण्याचा प्रयत्न
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध

(म्हणे) ‘रा.स्व. संघाचे कार्यकर्ते नक्षलवाद्यांप्रमाणे काम करतात ! – छत्तीसगडचे काँग्रेसी मुख्यमंत्री भूपेश बघेल

संघाचे स्वयंसेवक नक्षलवाद्यांप्रमाणे काम करत असते, तर बघेल यांना असे बोलण्याचे धाडसच झाले नसते !

नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने तेलंगाणा आणि आंधप्रदेश येथील कन्यका परमेश्‍वरी देवी मंदिरांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या नोटांद्वारे आरास !

मंदिरांची आरास करण्यासाठी नोटांचा वापर करणे अत्यंत अयोग्य आहे. हिंदूंना धर्मशिक्षण आणि सामाजिक भान नसल्याने ते सवंग लोकप्रियतेसाठी अशा काहीतरी कृती करत असतात !

‘जे.एन्.यू.’नंतर आता देहली विद्यापीठ कह्यात घेण्यासाठी साम्यवाद्यांकडून ‘मार्क्स (गुण) जिहाद’चे षड्यंत्र !

साम्यवादी आणि जिहादी विचारसरणी ही भारताच्या मुळावर उठलेली असल्याने देहली विद्यापिठात त्यांचा दबदबा वाढण्याआधीच त्यावर चाप बसायला हवा. यासाठी राष्ट्रप्रेमी जनतेने वैध मार्गाने आंदोलन करणे आवश्यक आहे !

‘सॅटो टॉयलेट्स एशिया’ आस्थापनाने श्री दुर्गादेवीचा अवमान करणारे विज्ञापन हटवले !

हिंदूंनो, या यशाविषयी भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा ! हिंदु धर्माच्या होत असलेल्या अनादराच्या प्रत्येक प्रकरणाच्या विरोधात वैध मार्गाने आंदोलन करणे, हे आपले धर्मकर्तव्य असून ते बजावल्यास आपली साधनाही होणार आहे, हे लक्षात घ्या !

निवडणुकीसाठी पक्ष कार्यकर्त्यांना चालना मिळण्यासाठी अमित शहा यांची गोवा भेट महत्त्वाची ! – देवेंद्र फडणवीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १४ ऑक्टोबरला गोव्यात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी गोवा शासन सिद्ध झाले आहे. वर्ष २०२२ मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षातील कार्यकर्त्यांना चालना मिळण्यासाठी अमित शहा यांची गोवा भेट महत्त्वाची असल्याचे…

(म्हणे) ‘हे लोक म. गांधी यांच्याऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना राष्ट्रपिता बनवतील !’ – असदुद्दीन ओवैसी यांची टीका

मुळात गांधी यांना ‘राष्ट्रपिता’ अशी दिलेली पदवीच चुकीची आहे. गांधी यांना अशा प्रकारची ओळख देण्याचे काम काँग्रेसींनी स्वार्थासाठी केले आहे. खर्‍या देशभक्तांना ते कदापि मान्य नाही.