पिंपरी-चिंचवडमध्ये (जिल्हा पुणे) ३०० कोटींच्या ‘क्रिप्टो करन्सी’साठी पोलिसानेच केले अपहरण !

जनतेचे रक्षण करणार्‍या पोलिसांनीच अपहरण करणे यांसारखी लज्जास्पद गोष्ट कोणती ? असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच असल्याने शासनाने त्यांना बडतर्फ करून कायद्यानुसार कठोर शिक्षा करावी, ही अपेक्षा !

डिजिटल करन्सी ‘रूपी’ म्हणजे क्रिप्टो करन्सी (आभासी चलन) नाही ! – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्

याविषयी त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, रिझर्व्ह बँकेच्या अधिकाराच्या बाहेर असणार्‍या कोणत्याही चलनाला आम्ही चलन म्हणणार नाही. आम्ही ‘रूपी’ चलनावर कोणताही कर लावणार नाही.

आम्हाला इच्छामरणाची अनुमती द्या !

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथील वैद्यकीय महाविद्यालयाला अनुमती नसल्याने १२ विद्यार्थ्यांची राष्ट्रपतींकडे मागणी

बेंगळुरू रेल्वे स्थानकावरील हमालांच्या कक्षाला धर्मांधांनी बनवलेले प्रार्थनास्थळाचे रूप पालटले !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधाचा परिणाम !

भारतीय कायद्याचे पालन करा, अथवा गाशा गुंडाळा ! – आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची ट्विटरला चेतावणी

भारतात व्यवसाय करून भारतीय न्यायव्यस्थेच्या विरोधात बोलणार्‍या विदेशी आस्थापनांना भारतातून हद्दपार करणेच आवश्यक !

कर्णावती येथे पाकमधील जिहादी संघटनेसाठी गोळा केले जात आहेत पैसे !

गुजरातमध्ये भाजपचे राज्य असतांना तेथे अशा प्रकारच्या दानपेट्यांद्वारे जिहादी संघटनांसाठी पैसा गोळा करण्यात येत आहेत, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने धर्मांधांवर वचक निर्माक केला पाहिजे !

कलम ३७० हटवल्यापासून आतापर्यंत काश्मीरमध्ये ४३९ आतंकवादी ठार

इतके आतंकवादी ठार होऊनही काश्मीरमधील स्थिती सामान्य झालेली नाही. त्यामुळे विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्य झालेले नाही. काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी त्याचा निर्माता पाकला नष्ट करणे आवश्यक !

भारताची राज्यघटना नव्याने लिहिण्याची आवश्यकता ! – तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

भारताची राज्यघटना नव्याने लिहिण्याची आवश्यकता आहे. देशातील सर्व नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असून त्यांना ‘माझ्या समवेत लढणार का ?’, असे विचारणार आहे.

कोरोनामुळे कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याच्या रागातून बिर्ला मंदिरातील राहू आणि केतु यांच्या मूर्तींची तोडफोड

हिंदूंना आतापर्यंत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे ! साधनेमुळे प्रत्येक व्यक्तीला जन्म, मृत्यू, प्रारब्ध, जीवनाचा उद्देश आदींचे ज्ञान होते आणि तो सर्व सुख-दुःखांवर मात करून आनंदी राहू शकतो !

गुंटूर (आंध्रप्रदेश) येथे जीना टॉवरला तिरंगा रंग

गुंटूर येथील जीना टॉवरला तिरंगा रंग देण्यात आला आहे. येथील आमदार महंमद मुस्तफा म्हणाले की, विविध गटांच्या विनंतीवरून टॉवरला तिरंग्याने रंगवण्याचा आणि राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.