वडिलांनी महागड्या भ्रमणभाषविषयी विचारल्‍याने तरुणाची आत्‍महत्‍या

महागड्या भ्रमणभाषच्‍या आहारी जाणारी आणि संयम नष्‍ट झाल्‍याने क्षुल्लक कारणावरून टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवणारी आजची तरुणाई !

जंगली महाराज रस्‍ता येथे येथे पू. भिडेगुरुजींनी केले पालखीचे सारथ्‍य !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी जंगली महाराज रस्‍ता येथे संतश्रेष्‍ठ तुकाराम महाराज यांच्‍या पालखीचे सारथ्‍य केले. या वेळी सहस्रोंच्‍या संख्‍येने धारकरी उपस्‍थित होते.

पालखी सोहळ्‍यासाठी सजवण्‍यात आले होते श्री निवडुंगा विठोबा मंदिर !

संतश्रेष्‍ठ तुकाराम महाराजांची पालखी येथील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात २ दिवस वास्‍तव्‍याला होती. या निमित्ताने श्री निवडुंगा विठोबा मंदिर विविध फुलांनी, तसेच विद्युत् रोषणाईने सजवण्‍यात आले होते.

अकोला येथे हिंदु जनजागृती समितीची पत्रकार परिषद

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या कार्याला गती देण्‍यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्‍थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ आयोजित करण्‍यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्‍णालयातील परिचारिकांचे वेतनवाढीसाठी आंदोलन !

या आंदोलनात परिचारिका मोठ्या संख्‍येने सहभागी झाल्‍या होत्‍या. ‘परिचारिकांना सुधारित वेतनश्रेणी वाढवून मिळालीच पाहिजे’, अशी मागणी ‘महाराष्‍ट्र गव्‍हर्मेंट नर्सेस फेडरेशन’च्‍या वतीने करण्‍यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील ‘दामिनी पथका’कडे १२ दिवसांत २२ तक्रारी !

शाळा-महाविद्यालये येथील विद्यार्थिनी, युवती आणि महिला यांच्‍या अडचणी जाणून घेणे, तसेच रोडरोमियोंकडून होणारा त्रास अल्‍प करण्‍यासाठी वर्ष २०१७ मध्‍ये ‘दामिनी पथक’ स्‍थापन केले होते

माऊलींच्‍या पालखी दर्शनासाठी भाविकांच्‍या लांबच लांब रांगा !

संतश्रेष्‍ठ श्री ज्ञानेश्‍वर माऊली आणि जगद़्‍गुरु तुकाराम महाराज यांच्‍या पालख्‍या पुणे येथे विसाव्‍यासाठी आल्‍यावर भक्‍तांनी पालखी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्‍या आहेत.

आज ‘नो हॉँकिंग डे’ पाळा !

ध्‍वनीप्रदूषणामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्‍य यांची हानी होत असल्‍याने पोलिसांनी हॉर्न (भोंगा) न वाजवता या उपक्रमाला सकारात्‍मक प्रतिसाद देण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

जुहू समुद्रकिनार्‍यावर बुडलेल्‍या ५ मुलांपैकी एक जण वाचला !

मुंबईतील जुहू समुद्रकिनारी सायंकाळी पोहण्‍यासाठी गेलेली ५ मुले समुद्रात बुडली होती. त्‍यांतील एका मुलाला वाचवण्‍यात स्‍थानिक मच्‍छिमारांना यश आले

इगतपुरी येथे गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या ३ जणांना मारहाण

पोलीस गोवंशियांची वाहतूक रोखू शकत नसल्‍यामुळे गोप्रेमींना गोवंशियांची अवैध वहातूक रोखावी लागते ! हे पोलिसांचे अपयशच आहे ! पोलीस त्‍यांचे कर्तव्‍य कधी बजावणार ?