पुण्यात आधुनिक वैद्यांच्या ‘प्रिस्क्रिप्शन’विना उत्तेजनयुक्त औषध विक्री करणार्‍या तरुणाला अटक

रोहन प्रल्हाद लोंढे हा तरुण आधुनिक वैद्यांच्या ‘प्रिस्क्रिप्शन’विना शरीर सौष्ठव करणार्‍या तरुणांना अवैधरित्या उत्तेजनयुक्त औषध विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना २२ ऑक्टोबरला मिळाली. त्यानुसार स्वारगेट पोलिसांनी रोहनला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

शिवसेनेच्या पदाधिकार्‍याची भर चौकात हत्या; लोणावळ्यात १२ घंटयात २ हत्या

कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

सातारा विकास आघाडीच्या वतीने ८ विकासकामांचे भूमीपूजन

विकासकामांचे उद्घाटन आणि भूमीपूजन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या विकासकामांसाठी अनुमाने २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

विजयादशमीच्या निमित्ताने विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने महाआरती

या वेळी बाळ महाराज, श्री. संतोष हत्तीकर, तसेच अन्य पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इचलकरंजी नगरपालिकेत स्वत:ला पेटवून घेणार्‍या सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांचा मृत्यू !

एक नागरिक पालिकेच्या मुख्याधिकार्‍याकडे तक्रार करूनही त्यावर काहीच कार्यवाही का होत नाही ? तसेच नागरिकाला संबंधितांवर कारवाई होण्यासाठी आत्मदहनाची चेतावणी द्यावी लागते, हेसुद्धा पालिका प्रशासनाला लज्जास्पद आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार

नगरसेवकांनी शाळेत विद्यार्थी येत नाहीत आणि पटसंख्या घटत आहे, शिक्षिका घरची कामे करत करत विद्यार्थ्यांना शिकवतात, शिक्षकांच्या बदलीसाठी ५ लाख रुपयांची मागणी केली जाते, अशी सूत्रे मांडली.

भीमाशंकर येथे विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांचे आंदोलन

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे बंद केलेले मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी उघडावेत म्हणून मंदिर परिसरात घंटानाद, शंखनाद आणि ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले.

सिंधुदुर्गात ३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत नवीन ३ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ७५९ झाली आहे. त्यांपैकी आतापर्यंत ४ सहस्र १३५ रुग्ण बरे झाले आहेत.

आगशी येथे आयोजित बैलांच्या झुंजीमध्ये २ बैलांचा मृत्यू : ८ जणांना अटक

आगशी येथे अवैधपणे आयोजित केलेल्या बैलांच्या झुंजीत २ बैलांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली. २२ ऑक्टोबर या दिवशी दांडे-आगशी भागात ही बैलांची झुंज आयोजित करण्यात आली होती.

धर्माचरण केल्यास महिलांचे सबलीकरण आपोआपच होईल ! – सौ. साधना गावडे

धर्माचरण केल्यास महिलांचे सबलीकरण आपोआपच होईल. महिलांनी नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून आपल्यातील देवीतत्त्व जागृत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. साधना गावडे यांनी केले.