चीनमध्ये राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍यांना ३ वर्षांचा कारावास होणार

एकीकडे भारतात राष्ट्रगीताला उभे राहायचे कि नाही, यावरून वादविवाद चालू असतांना चीनने मात्र त्यांच्या प्रस्तावित कायद्यात राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍यांना ३ वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली आहे.

सहस्रो कि.मी. अंतराचा बोगदा खणून ब्रह्मपुत्र नदीचा प्रवाह वळवण्याचा चीनचा प्रयत्न

ब्रह्मपुत्र नदीचा प्रवाह तिबेटमधून शिंजियांग येथे वळवण्यासाठी १ सहस्र कि.मी. अंतराचा बोगदा खणण्याचा विचार चीनचे अभियंते करत आहेत. हाँककाँकच्या ‘साउथ चाइना मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

इटलीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण !

इटलीच्या उत्तर भागात विविध घटनांमध्ये काही भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या मारहाणीच्या घटनांवर स्वराज यांनी ‘या घटनांवर मी जातीने लक्ष देत आहे, विद्यार्थ्यांनी चिंता करू नये’, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले.

वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडच्या प्रमाणात प्रचंड वाढ !

वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडच्या (CO2 च्या) प्रमाणात वर्ष २०१६ मध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या ८ लाख वर्षांमधील हे सर्वात अधिक प्रमाण आहे, असे संयुक्त राष्ट्रामध्ये विश्‍व मान्सून विज्ञान संघटनेने म्हटले आहे.

सोमालियामधील आत्मघातकी आक्रमणामध्ये २५ जण ठार, ३० घायाळ

सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील एका प्रसिद्ध हॉटेलच्या बाहेर झालेल्या आत्मघातकी आक्रमणामध्ये २५ जण ठार, तर ३० जण घायाळ झाले.

बारकोडच्या छपाईतील चुकांमुळे टपाल विभागाची इंटरनॅशनल ट्रॅक पॅकेट सर्व्हिस सेवा ठप्प

टपाल विभागाकडून राज्यात चालू होणारी इंटरनॅशनल ट्रॅक पॅकेट सर्व्हिस (आयटीपीएस्) ही सेवा बारकोडच्या छपाईत चुका झाल्याने रखडली आहे. राज्यभरातील टपाल विभागांना तांत्रिक दोष असलेले बारकोड पाठवण्यात आले आहेत.

बांगलादेश सरकार रोहिंग्या मुसलमानांची नसबंदी करणार

म्यानमारमधून स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या रोखण्यासाठी बांगलादेश सरकारने आता रोहिंग्या मुसलमानांची नसबंदी करण्यात येणार आहे, असे म्हटले आहे.

बांगलादेश येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता रवींद्र घोष यांना मातृशोक

बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे संस्थापक तथा बांगलादेशमधील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या मातोश्री छपाला बाला घोष (वय ९३ वर्षे) यांचे २६ ऑक्टोबर २०१७ या दिवशी त्यांच्या चित्तगांव, बांगलादेश येथील निवासस्थानी निधन झाले.

पाकमध्ये मौलानाकडून लहान मुलाशी लैंगिक चाळे

पाकमध्ये  मौलाना अब्दुल रऊफ यजदानी नावाच्या एका मौलानाने चारचाकी वाहनामध्ये एका लहान मुलाशी लैंगिक चाळे केल्याचे चित्रीकरण एका पाकिस्तानी पत्रकाराने पोस्ट केले.

आतंकवाद्यांवर कारवाई करा अन्यथा आम्ही त्यांचा अमेरिका स्टाईलने बीमोड करू ! – अमेरिकेची पाकला निर्णायक चेतावणी

पाकने आतंकवाद्यांवर निर्णायक कारवाई करावी. ही कारवाई करण्यात पाक अपयशी ठरला, तर आम्ही आतंकवाद्यांचा अमेरिका स्टाईलने बीमोड करू, अशी निर्णायक चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकला दिली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now