काबूलमधील आत्मघातकी आक्रमणात २५ ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील विद्यापिठाजवळ २१ मार्च या दिवशी झालेल्या आत्मघातकी आक्रमणात २५ जण ठार, तर सुमारे १८ जण घायाळ झाले.

व्लादिमीर पुतिनच पुन्हा रशियाचे अध्यक्ष

रशियामध्ये १८ मार्चला अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान पार पडले. त्यात रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी परत विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांना आता आणखी ६ वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे.

प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचे निधन

भौतिकशास्त्र आणि विश्‍वनिर्मिती (कॉस्मोलॉजी) या क्षेत्रांत भरीव योगदान देणारे प्रख्यात शास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग (वय ७६ वर्षे) यांचे त्यांच्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात् ल्युसी, रॉबर्ट आणि टीम ही तीन मुले आहेत. विश्‍वाची उत्पत्ती आणि कृष्णविवर यांसंदर्भात त्यांनी संशोधन केले होते.

श्रीलंकेतील बौद्ध आणि मुसलमान पंथातील संघर्षाची १० कारणे

श्रीलंकेतील कँडी या ठिकाणी उसळलेल्या दंगलीनंतर तेथील सरकारने १० दिवसांची आणीबाणी घोषित केली. ‘बौद्ध’ पंथ हा शांतताप्रिय आहे’, असे म्हटले जाते. तरीही ‘श्रीलंकेत बौद्ध आणि मुसलमान या दोन्ही पंथांमध्ये संघर्ष का उसळला ?’, ‘श्रीलंकेत संचारबंदी, जमावबंदी आणि आणीबाणी का लागू करण्यात आली ?’

काठमांडूत विमान कोसळून ५० जण ठार

ढाक्याहून काठमांडूला जाणारे ‘यूएस्-बांगला एअरलाइन्स’चे विमान नेपाळमधील काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतांना कोसळले. या अपघातात अनुमाने ५० जण ठार झाले.

इंडोनेशिया येथील ‘सनातन धर्म गमा साधना’ या संघटनेच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सन्मान

हिंदु धर्माभिमानी श्री. गोपालन् यांनी स्थापन केलेल्या ‘सनातन धर्म गमा साधना’ या संघटनेची मासिक बैठक १० मार्च या दिवशी जकार्ता येथील रेडस्टार या हॉटेलमध्ये झाली.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने जकार्ता (इंडोनेशिया) येथे अभ्यासदौर्‍यासाठी गेलेल्या गटाची तेथील हिंदु धर्मप्रमुखांशी भेट

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे अभ्यासदौर्‍यासाठी गेलेल्या गटाने तेथील हिंदु धर्मप्रमुखांची नुकतीच भेट घेतली

चीनचे राष्ट्रपती आजन्म पदावर रहाणार ?

चीनमध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या पदावर रहाण्याच्या २ कार्यकाळाची अनिवार्यता चीनी संसदेने संपुष्टात आणली.

आतंकवादाचे पोषण करणार्‍या देशाने आम्हाला मानवाधिकाराविषयी शहाणपण शिकवू नये !

संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेच्या एका बैठकीमध्ये काश्मीरचे सूत्र उपस्थित करणार्‍या पाकिस्तानला भारताने सणसणीच चपराक लागावली. जिहादी आतंकवादाचे पालन पोषण करणार्‍या देशाने भारताला शहाणपण शिकवू नये.

श्रीलंकेमध्ये पुन्हा धार्मिक हिंसाचार वाढला !

श्रीलंकेच्या कॅण्डी या पर्वतीय जिल्ह्यात आणीबाणी घोषित केल्यानंतरही बहुसंख्यांक सिंहली बौद्ध आणि अल्पसंख्याक मुसलमान यांच्यातील धार्मिक हिंसाचार पुन्हा उसळला आहे. या संघर्षात दुकानांची आणि घरांची हानी झाली आहे.


Multi Language |Offline reading | PDF