पाकिस्तानमध्ये घराच्या भिंतीवर ‘हिंदुस्तान झिंदाबाद’ लिहिल्याने तरुणाला देशद्रोहाच्या गुन्ह्यांतर्गत अटक

पाकच्या खबर-पख्तूनख्वा प्रांतातील नारा अमाजी परिसरातील घराच्या भिंतीवर ‘हिंदुस्तान झिंदाबाद’ लिहिणार्‍या साजीद शाह या तरुणाच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे.

इस्रायलकडून सिरीयाच्या सैन्यतळावर क्षेपणास्त्रांचा मारा 

इस्रायलने ४ डिसेंबरच्या रात्री सिरीयाची राजधानी दमिश्कजवळ सैन्याच्या तळावर क्षेपणास्त्रांचा मारा केला; मात्र सिरीयाच्या वायूदलाने इस्रायलची ३ क्षेपणास्त्रे हवेत उद्ध्वस्त केली.

पाकिस्तानच्या ग्वादर बंदराला शह देणार्‍या इराणमधील चाबहार बंदराचे उद्घाटन !

भारताच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या इराणमधील चाबहार बंदराच्या पहिल्या विस्तारित टप्प्याचे ३ डिसेंबरला इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या बंदरामुळे भारताला इराणमधून अफगाणिस्तानशी संपर्क साधता येणार आहे.

बांगलादेशमध्ये ख्रिस्ती धर्मगुरूंच्या अपहरणाची हिंदुत्वनिष्ठ ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’कडून चौकशीची मागणी

बांगलादेशच्या नाटोर जिल्ह्यात अल्पसंख्यांक ख्रिस्ती समुदायाचे धर्मगुरु वॉल्टर विलियम रूझारिओ (वय ४२ वर्षे) यांचे काही धर्मांधांनी २९ नोव्हेंबरला अपहरण केले. ख्रिस्ती धर्मगुरूंच्या अपहरणाविषयी माहिती मिळताच ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी बोरेग्राम पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून चौकशीची मागणी केली.

बोस्नियाच्या माजी सैन्याधिकार्‍याची आंतरराष्ट्रीय न्यायालयात विष पिऊन आत्महत्या

वर्ष १९९५ मध्ये बोस्नियामध्ये झालेल्या ८ सहस्र मुसलमानांच्या हत्याकांडाच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले बोस्नियाचे कमांडर स्लोदान प्रालियेक यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीशांसमोरच विष पिऊन आत्महत्या केली.

आतंकवादाविरोधात सौदी अरेबिया सरकारकडून पंचतारांकित केंद्र

सौदी अरेबियाने देशातील कट्टरपंथी आतंकवाद्यांच्या पुनर्वसनासाठी पंचतारांकित केंद्र स्थापन केले आहे. आतंकवाद्यांसाठी असलेल्या समुपदेशन आणि पुनर्वसन केंद्रात पंचतारांकित सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

(म्हणे) डोकलाम आमचाच भाग असल्याने तेथे सैन्य तैनात करणार !

डोकलाम हा चीनचा भाग आहे आणि हेच लक्षात ठेवून त्या भागात आमच्याकडून सैन्य तैनात केले जाईल, असे विधान चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कोल वू कियान यांनी केले आहे.

रशियामध्ये हिंदु धर्माचा प्रसार करणार्‍यांवर धर्मांध ख्रिस्ती संघटनांचे आक्रमण

रशियामध्ये राहून हिंदु धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे श्री. प्रकाश यांच्यावर ख्रिस्ती धर्मांधांनी आक्रमण केल्याची घटना घडल्याचे वृत्त एएन्आय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

शिकागो (अमेरिका) येथील एका चर्चचे नृत्य निकेतनमध्ये रूपांतर होणार

येथील लिंकन पार्कमधील १४२ वर्षे जुन्या हरमन बाप्टिस्ट चर्चचे नृत्य निकेतनमध्ये रूपांतर करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

बांगलादेशमध्ये हिंदु महिलेचे अपहरण आणि बळजोरीने धर्मांतर

बांगलादेशच्या आदमदिही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २५ वर्षीय हिंदु महिलेचे काही धर्मांधांनी २७ नोव्हेंबरच्या रात्री अपहरण केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now