54th iffi At Goa : आज ५४ व्या ‘आंचिम’चा पडदा ‘कॅचिंग डस्ट’ चित्रपटाने उघडणार

‘आंचिम’ हा कान्स, बर्लिन आणि व्हेनिस यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या तोडीचा महोत्सव आहे. यंदा ‘आंचिम’मध्ये २७० पेक्षा अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत. ५३ व्या ‘आंचिम’पेक्षा यंदा चित्रपटांची संख्या १८ ने अधिक आहे.

Maldives withdraws Indian army : भारतीय सैन्‍य माघारी घेण्‍याचे मालदीवच्‍या नवनिर्वाचित आणि चीनधार्जिण्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांचा आदेश !

मालदीवचे नवनिर्वाचित राष्‍ट्राध्‍यक्ष महंमद मुइझ्‍झू यांनी राष्‍ट्राध्‍यक्षपदाची शपथ घेतल्‍यानंतर दुसर्‍याच दिवशी म्‍हणजे १८ नोव्‍हेंबरला भारतीय सैन्‍याचे मालदीवमध्‍ये असलेले सैनिक परत बोलवण्‍याचे औपचारिक निर्देश दिले.

Russia aids Pakistan against Taliban : तालिबानसमवेत लढण्यासाठी रशियाचे साहाय्य घेण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान !

तालिबानची निर्मिती करण्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याने आणि आज हाच तालिबान पाकच्या मुळावर उठल्याने ‘जे पेरले, तेच उगवले’, ही म्हण सार्थ ठरते !

Terrorist Killed In Pakistan : पाकिस्तानमध्ये आणखी एका आतंकवाद्याची हत्या !

जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी ताज महंमद याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पसार झाले.

हमास आणि इस्रायल यांच्यात कोणताही करार झालेला नाही ! – इस्रायलने केले स्पष्ट

जोपर्यंत इस्रायलच्या ओलिसांची हमासकडून सुटका केली जात नाही आणि हमासला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत युद्ध चालूच रहाणार आहे.

Hospitals in Pakistan : आर्थिक कंबरडे मोडलेल्या पाकमधील ६ रुग्णालये बंद होण्याच्या स्थितीत !

पाकिस्तानमधील रुग्णालयांची दुर्दशा पहावयास मिळत आहे. देशातील ५ सरकारी रुग्णालये, तसेच लाहोरमधील शेख जायद रुग्णालय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.

Dog Meat Ban in South Korea : दक्षिण कोरियामध्ये कुत्र्याचे मांस खाण्यावर येणार बंदी

दक्षिण कोरियात कुत्र्याचे मांस खाण्यावरून जगभरातून टीका होत आहे. प्राणीमित्र संघटनाही याला विरोध करत आल्या आहेत.

Israel Attacks 2 schools : इस्रायलने गाझातील २ शाळांवर केलेल्या आक्रमणात ५० हून अधिक लोकांचा मृत्यू

इस्रायलने उत्तर गाझामधील जबल्या निर्वासित शिबिरात असलेल्या २ शाळांवर केलेल्या हवाई आक्रमणामध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात मुले आणि महिला यांचाही समावेश आहे.

चिकित्सेसाठी विदेशी संगीतापेक्षा भारतीय संगीत अधिक परिणामकारक !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष : ‘भारतीय शास्त्रीय संगीत हे विदेशी संगीताच्या तुलनेत विविध प्रकारच्या व्याधी न्यून करण्यासह आध्यात्मिक स्तरावरही परिणामकारक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.’

China never occupied foreign land : (म्हणे) ‘चीनचे अन्य देशांच्या १ इंच भूमीवरही नियंत्रण नाही !’

‘हिंदी-चिनी भाई भाई’ म्हणत भारतावर आक्रमण करणार्‍या चीनची मानसिकता जगाला ठाऊक असल्याने शी जिनपिंग यांच्या असल्या थापांवर कोण विश्‍वास ठेवणार ?