इसिसच्या नव्या प्रमुखास जिवे मारल्याचा अमेरिकेचा दावा

इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेचा प्रमुख अबू बक्र अल्-बगदादी याला ठार केल्यानंतर त्याची जागा घेणार्‍या दुसर्‍या आतंकवाद्यालाही ठार केले आहे. बहुधा त्यानेच इसिसचे प्रमुख पद घेतलेे असावे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली.

(म्हणे) ‘भारतीय सैन्यप्रमुख युद्धखोरीची भाषा करत आहेत !’

पाकचे मंत्री भारताला ‘अणूयुद्धाची धमकी देतात’, ही भाषा युद्धाची नव्हे का ? याला म्हणतात, ‘चोराच्या उलट्या बोंबा !’ पाक सैनिक शस्त्रसंधीचे उल्लंघन करतात, पाकपुरस्कृत आतंकवादी भारतात घुसखोरी करतात, तसेच पाकमधील आतंकवादी संघटना भारतातील महत्त्वाच्या स्थळांवर आक्रमणे करतात. ही कृत्ये युद्धखोरीची नाहीत का ?

पंतप्रधान मोदी यांच्या विमानाला आपल्या हवाई हद्दीतून प्रवेश देण्यास पाकचा पुन्हा नकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर जाण्यासाठी त्यांच्या विमानाला हवाई हद्दीतून प्रवेश देण्यास पाकिस्तानने पुन्हा नकार दिला आहे…. कुरापतखोर पाक ! वारंवार अशी आगळीक करणार्‍या पाकला आता कायमचाच धडा शिकवण्याची वेळ आली आहे !

वर्ष १९९२ पासून बंद असलेले सियालकोटचे १ सहस्र वर्षे प्राचीन मंदिर हिंदूंना सुपुर्द !

वर्ष १९९२ मध्ये बाबरी ढाचा पाडल्यानंतर सियालकोटच्या मुसलमानांनी मंदिरावर केले होते आक्रमण ! अयोध्येतील राममंदिराचा निकाल हिंदूंच्या बाजूने लागल्यास सियालकोटसह पाकिस्तानमधील सर्वच मंदिरांच्या रक्षणाचे दायित्व पाक सरकार घेणार का ?

अमेरिकेच्या कारवाईत ‘इस्लामिक स्टेट’चा प्रमुख बगदादी ठार झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

अवघे जग इस्लाममय करण्याची स्वप्ने पाहणार्‍या ‘इसिस’ या क्रूर आतंकवादी संघटनेचा प्रमुख अबू बक्र अल्-बगदादी याला अमेरिकेच्या सैन्याने ठार केले आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे केला आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना हृदयविकाराचा झटका

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. सध्या त्यांच्यावर लाहोरच्या सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.

इराकमध्ये सरकारविरोधी आंदोलनात ६३ नागरिकांचा मृत्यू

संपूर्ण इराकमध्ये नागरिकांनी भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि खराब नागरी सुविधा या सूत्रांवरून आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनामध्ये आतापर्यंत ६३ नागरिकांचा मृत्यू झाला असून २ सहस्र ५०० हून अधिक नागरिक घायाळ झाले आहेत.

(म्हणे) ‘काश्मीरमध्ये विदेशी पत्रकार आणि अमेरिकी काँग्रेस प्रतिनिधी यांना प्रवेश द्यावा !’

पाकव्याप्त काश्मीर, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंची स्थिती काय आहे, हे जाणण्यासाठी अमेरिकी काँग्रेस सदस्यांनी अशा प्रकारची मागणी कधी केली होती का ? भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये ढवळाढवळ करू पाहणारी अमेरिकी काँग्रेस !

पाकिस्तानने जगभरातील राजदूतावासांमध्ये उभारला ‘काश्मीर कक्ष’

पाकने काश्मीर कक्ष चालू करण्यामागे ‘विविध देशांत असलेल्या स्थानिक पाकिस्तानी नागरिकांना भडकावणे आणि खोट्या प्रचाराच्या माध्यमातून त्यांचे कट्टरतावाद निर्माण करणे’, हा मुख्य हेतू आहे. हे कक्ष हिंसाचाराला उघड प्रोत्साहन देत असल्यामुळे ते बंद करायला हवेत.

आतंकवादासारख्या गंभीर सूत्रांवर आंतरराष्ट्रीय करार व्हावा ! – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

आतंकवादासारख्या गंभीर सूत्रांवर अन्वेषण यंत्रणांच्या परस्पर सहकार्याचा आणि माहितीच्या देवाण-घेवाणीचा व्यापक असा आंतरराष्ट्रीय करार व्हावा, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले.