संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये तुर्कीयेने काश्मीरप्रश्‍नी पाकची ‘री’ ओढली !

याला म्हणतात कुत्र्याची शेपटी किती सरळ करण्याचा प्रयत्न केला, तरी ती वाकडीच रहाते ! भारताने भूकंपाच्या काळात तुर्कीयेला साहाय्य करूनही तो अजूनही पाकच्याच नादी लागलेला आहे, हे स्पष्ट होते !

चीनने पाकिस्तानला पुन्हा दिले ४ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज !

पाकिस्तान आता अशाच प्रकारच्या भिकेवर जगणारा देश म्हणून काही मास ओळखला जाईल आणि नंतर त्याचे अस्तित्व जगाच्या नकाशावरून संपुष्टात येईल, हे सांगायला आता कोणत्याही ज्योतिषाची आवश्यकता राहिलेली नाही !

कोरोनाच्या उत्पत्तीविषयीची माहिती आम्हाला द्या ! – जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व देशांना आवाहन

कोणत्याही देशाकडे कोरोनाच्या उत्पत्तीशी संबंधित काही माहिती असल्यास त्यांनी ती आम्हाला द्यावी. आम्हाला केवळ हे जाणून घ्यायचे आहे की, महामारी कशी आणि कुठे प्रारंभ झाली ? आम्हाला काही ठोस माहिती मिळाल्यास आम्ही आगामी काळात येणारी महामारी टाळण्याचे मार्ग शोधू शकतो.

ब्रिस्बेनच्या लक्ष्मीनारायण मंदिरावर लिहिण्यात आल्या पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणा !

हिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तानवाद्यांकडून होणारी आक्रमणे, तसेच हिंदूंवर होणारी आक्रमणे रोखण्यात ऑस्ट्रेलियातील सरकारला येत असलेले अपयश लज्जास्पद आहे ! भारत सरकारने याविषयी जाब विचारणे आवश्यक आहे !

रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी भारताने विशिष्ट भूमिका बजावली पाहिजे ! – अमेरिका

. . . कारण त्याचे रशियाशी अनेक वर्षांपासून ऐतिहासिक संबंध आहेत. तसेच भारताकडे नैतिक स्पष्टतेने बोलण्याचीही क्षमता आहे, जी आम्ही पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये पाहिली आहे – अमेरिका

सीमाप्रश्‍न लवकरात लवकर सोडवण्यासाठी एकत्रित काम केले पाहिजे ! – चीन

असे चीनचे परराष्ट्रमंत्री किन गांग यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याशी बोलतांना म्हटले आहे.

रशियाकडून विशेष विशेषाधिकार प्राप्त, रणनीतीचा सहकारी दर्जा प्राप्त करणारा एकमेव देश भारत !

हा अधिकृत दर्जा आहे. मला नाही वाटत की, आम्ही असा अधिकृत दर्जा अन्य कुणाला दिलेला आहे, अशा शब्दांत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी भारताचे कौतुक केले !

माझ्या भ्रमणभाषची हेरगिरी केली जाते ! – राहुल गांधी यांचा केंब्रिज विश्‍वविद्यालयात दावा

भारतीय राज्यघटनेत भारताला राज्यांचा संघ म्हटले आहे. त्या संघाशी चर्चा आवश्यक आहे. आता हा संवादच संकटात सापडला आहे. विरोधी पक्षांचे नेते काही सूत्रांवर चर्चा करत होते. त्यांना कारागृहात डांबले. असे ३-४ वेळा झाले. ते अत्यंत हिंसक होते.

(म्हणे) शेजारील देशाला होत असलेल्या शस्त्रपुरठ्यामुळे दक्षिण आशियात अस्थिरता ! – पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार

गेली अनेक दशके अमेरिकेकडून पाकला होत असलेल्या शस्त्रपुरवठ्यामुळे ही अस्थिरता निर्माण होत नव्हती का ?

भारत जी-२०चा अध्यक्ष म्हणून आशादायक प्रारंभ करत आहे ! – अमेरिका  

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता नेड प्राइस पत्रकार परिषदेत म्हणाले की, आजपर्यंत भारताने जी-२० चे नेतृत्व केले आहे, त्यासाठी आम्ही आमच्या भारतीय भागीदारांचे आभारी आहोत.