मूळ स्थिती बलपूर्वक पालटू पहाणार्‍या एकतर्फी कृतींना आमचा तीव्र विरोध !

सहभागी देशांनी चीनच्या कुरघोड्यांवर टीका केली आहे. ‘आमचा मूळ स्थिती बलपूर्वक पालटू  पहाणार्‍या अस्थिर किंवा एकतर्फी कृतींना तीव्र विरोध आहे’, असे या देशांनी संयुक्तपणे प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अमेरिकेत हिंदु रुग्णांची श्रद्धा जाणून घेण्यासाठी डॉक्टरांना करावा लागणार ‘क्रॅश कोर्स’!

अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच हिंदु रुग्ण रुग्णालयांच्या खाटेवर प्रार्थना करू शकतील. आपल्या इष्ट देवतेची मूर्ती समवेत ठेवू शकतील. अमेरिकेत प्रथमच अशा प्रकारची अनुमती देण्यात आली आहे.

युद्धावर उपाय शोधण्यासाठी भारत शक्य ते करण्याचा प्रयत्न करील ! – पंतप्रधान मोदी

‘जी ७’ देशांच्या वार्षिक शिखर संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही करण्यात आली.

भारताने पाडले पाकिस्तानी तस्करांचे २ ड्रोन

सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी तस्करांनी एकाच रात्री पाठवलेले २ ड्रोन पाडले.

(म्हणे) ‘वादग्रस्त भागात बैठक घेण्यास आमचा विरोध !’

श्रीनगर येथे २२ ते २४ मे कालावधीत तिसरी ‘जी २०’च्या पर्यटन कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित रहाण्यास चीनने नकार दिला आहे.

अंतराळ संशोधनासाठी पैसे खर्च करण्यात भारत जगात ७ व्या क्रमांकावर !

अंतराळ संशोधनासाठी अमेरिका भारताच्या तुलनेत ३२ पटींहून अधिक पैसे खर्च करते. ही माहिती द हेग येथील ‘वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’ या खासगी आस्थापनाने दिली आहे.

गोव्‍यात प्रथमच ‘सी २०’ परिषदेचे आयोजन !

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी या ‘सिव्‍हिल २०’ परिषदांतील धोरणे आध्‍यात्‍मिक दृष्‍टीकोनांचा अवलंब करून बनवावीत, अशी सूचना केली आहे. भारतातील ‘सिव्‍हिल २०’ परिषदेच्‍या अध्‍यक्षस्‍थानी ‘माता अमृतानंदमयी मठा’च्‍या संस्‍थापिका प.पू. माता अमृतानंदमयी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

नेदरलँड्समध्ये ‘द केरल स्टोरी’च्या प्रदर्शनास आरंभ !

कुठे नेदरलँड्समधील जनतेने चित्रपटाच्या माध्यमातून ‘जिहाद’ विरोधात सतर्क व्हावे, असे वाटणारे खासदार गीर्ट विल्डर्स, तर कुठे जिहादी आतंकवादाने होरपळून निघालेल्या बंगाल राज्यात चित्रपटावर बंदी लादणार्‍या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी !

लहान वयापासून स्मार्टफोन वापरल्यास मानसिक आजारांचे प्रमाण अधिक ! – संशोधन

भारतातून केवळ ४ सहस्त्र मुलांचा या संशोधनात सहभाग असला, तरी हे प्रमाण काळजी करण्यासारखे आहे. भारतात १० ते १४ वयोगटांतील तब्बल ८३ टक्के मुलांच्या हातात स्मार्टफोन आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणापेक्षा ही संख्या ७६ टक्क्यांहून अधिक आहे.

बांगलादेशच्या नौगाव जिल्ह्यातील कालीमंदिराला धर्मांध मुसलमानांनी लावली आग !

इस्लामी बांगलादेशसमवेत हिंदूबहुल भारताचे संबंध सुधारत असूनही तेथील हिंदूंची मंदिरे आणि देवतांच्या मूर्ती मात्र असुरक्षितच आहेत. केंद्रशासनाने बांगलादेशला यावर जाब विचारणे आवश्यक !