टिपू सुलतानच्या तलवारीचा लंडनमध्ये १४३ कोटी रुपयांना लिलाव !

लिलावगृहाच्या संकेतस्थळानुसार, टिपूच्या पराभवानंतर तलवार त्याच्या शयनकक्षात मिळाली होती. मोगल शस्त्र निर्मात्यांनी ही तलवार जर्मन ब्लेड पाहून बनवली होती.

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत दाखवण्यात आला पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील वादग्रस्त माहितीपट !

ऑस्ट्रेलियन नागरिकांचा हिंदुद्वेष !
बीबीसीने हा चित्रपट बनवला आहे. भारत सरकारने देशात या माहितीपटावर बंदी घातली आहे.

गोव्यात जून मासात ‘जी-२०’च्या ३ बैठका होणार !

५ ते ७ जून या कालावधीत तिसरी ‘इंटरनॅशनल फायनान्शियल आर्किटेक्चर वर्किंग ग्रूप’ची, १९ ते २० जून या कालावधीत चौथी पर्यटन कृती गटाची बैठक आणि २१ अन् २२ जून या दिवशी पर्यटनमंत्र्यांची बैठक होणार आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी ट्वीट करून दिली.

२८ मे या दिवशी मॉरिशसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण !

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत नेण्याचे कार्य अव्याहतपणे चालू रहावे यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. या वर्षी हे संमेलन, मॉरिशस येथे स्वा. सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने २८ मे २०२३ या दिवशी होणार आहे.

अमेरिकेवर ऐतिहासिक आर्थिक संकटाची टांगती तलवार !

अमेरिकेला व्याज म्हणून प्रतिदिन १.३ अब्ज डॉलर इतका खर्च करावा लागत आहे. १ जूनची समयमर्यादा जसजशी जवळ येत आहे, तसतसे बाजार घसरत आहे आणि कर्ज घेण्याच्या खर्चात वाढ होत आहे.

न्यूयॉर्क विधानसभेत दिवाळीला सरकारी सुटी देण्याचा प्रस्ताव सादर

अमेरिकेतील न्यूयॉर्क विधानसभेमध्ये दिवाळीसाठी सरकारी सुटी घोषित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

जगाने पुढील महामारीसाठी सिद्ध रहावे, जी कोरोनापेक्षाही धोकादायक असू शकते ! – जागतिक आरोग्य संघटना

कोरोना ही आता जागतिक आणीबाणी नसली, तरी याचा अर्थ असा नाही की, आता यापासून कोणताही धोका नाही. जगाने पुढील महामारीसाठी सिद्ध रहावे, जी कोरोनापेक्षाही धोकादायक असू शकते.

उदास गाण्यांमुळे सुंदर आठवणींना उजाळा ! – संशोधन

भावना व्यक्त करणे, हे तणाव अल्प करण्यासह एकटेपणात साथसंगत करतात. उदास संगीत आपल्याला परिस्थितीची खरी ओळख करून देते. ‘आपण जे अनुभवत आहोत त्यात काहीच चुकीचे नाही’, हा विश्‍वास दु:खाने भरलेले संगीत आपल्याला देते.

पाकिस्तानच्या कारागृहात इस्लामिक स्टेटशी संबंध असलेल्या केरळमधील मुसलमानाचा मृत्यू

‘द केरल स्टोरी’ चित्रपटातील सत्य घटनांना खोटे ठरवणारे याविषयी बोलतील का ?

ऑस्ट्रेलियात मंदिरांवरील आक्रमणे खपवून घेतली जाणार नाहीत ! – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज

यापूर्वी ऑस्ट्रेलियात हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे झाल्यावर ती रोखण्याचे आश्‍वासन ऑस्ट्रेलियाने दिले होते; मात्र त्यानंतरही आक्रमणे चालू आहेत. त्यामुळे अशा आश्‍वासनांवर किती विश्‍वास ठेवायचा ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उमटणारच !