(म्हणे) ‘भारताने स्‍वतःला हवे ते म्‍हणावे; मात्र ‘भारत व्‍यापक आर्थिक सुधारणा करू शकतो का ?’, हा मोठा प्रश्‍न !’ – ‘ग्‍लोबल टाइम्‍स’

भारत काय करू शकतो आणि काय नाही, हे जग पहात असून चीनने यात नाक खुपसू नये !

आतंकवाद्यांच्या आक्रमणात पाकचे ११ सैनिक ठार

पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील चित्राल जिल्ह्यातील अफगाणिस्तानच्या सीमेवरील २ चौक्यांवर ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी  संघटनेने केलेल्या आक्रमणात पाकचे ११ सैनिक ठार घायाळ झाले.

खलिस्‍तानी आतंकवाद संपवण्‍यासाठी ब्रिटन भारतासमवेत ! – पंतप्रधान ऋषी सुनक

ऋषी सुनक यांनी असे केवळ म्‍हणू नये, तर प्रत्‍यक्ष कृती करावी, असेच भारताला वाटते !

फ्रान्समध्ये ‘अबाया’ घालून आलेल्या मुसलमान विद्यार्थिनींना माघारी पाठवले !

अनुमाने ३०० हून अधिक मुसलमान विद्यार्थिनी अबाया परिधान करून शाळेत आल्या होत्या. त्यांतील ६७ विद्यार्थिनींनी अबाया काढण्यास नकार दिला. त्यांना घरी पाठवण्यात आले.

(म्हणे) ‘दुर्दैवाने तुमच्या शेजारी भारतासारखा देश !’ – चीनचे नेपाळमधील राजदूत

भारताविषयी असे विधान करणार्‍या नेपाळमधील चिनी राजदूतांना भारताने कडक भाषेत सुनावणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘भारतासमवेतचे संबंध स्थिर !’ – चीन

चीनच्या या विधानावर कोण विश्‍वास ठेवणार ? चीनची बोलणे आणि करणे यात नेहमीच भेद राहिलेला आहे !

पंतप्रधान मोदी यांच्या इंडोनेशिया येथील ‘आसियान-इंडिया परिषदे’च्या कार्यक्रम पत्रिकेवर ‘भारताचे पंतप्रधान’ असा उल्लेख !

काँग्रेसची टीका
(‘आसियान’ म्हणजे दक्षिण-पूर्व आशिया देशांची संघटना)

गिलगिट-बाल्टिस्तान येथे शिया मुसलमानांकडून पाक सैन्याच्या विरोधात आंदोलन !

पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान येथे तेथील शिया मुसलमानांकडून पाकिस्तानी सैन्य आणि सुन्नी मुसलमान संघटना यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे.

कॅनडामधील शाळेत स्वतंत्र खलिस्तानसाठी आयोजित जनमताचा कार्यक्रम रहित !

कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत. तेथील शाळेत जनमत घेण्याचे धारिष्ट्य खलिस्तानवादी घेतात आणि तेथील सरकार यात हस्तक्षेप करत नाही, हे संतापजनक !

आम्हाला युद्ध नको आहे ! – पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनावरुल हक काकर

असे म्हणणार्‍या पाकनेच काश्मीरवरून भारताशी ४ युद्धे केली आहेत. त्यामुळे पाकवर कोण विश्‍वास ठेवणार ? पाकने युद्ध केले, तर आता त्याचा संपूर्ण विनाश अटळ आहे, हेही त्याला ठाऊक आहे !