रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्‍नावरून शेजारी देश युद्धजन्य स्थिती निर्माण करत आहे ! – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना

रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्‍नावरून शेजारी देश युद्धजन्य स्थिती निर्माण करत आहे; मात्र आम्ही संयम राखून संघर्ष टाळलेला आहे, असे प्रतिपादन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले आहे. त्यांनी म्यानमारधील हिंसाचाराला वंशसंहार असे म्हटले आहे.

इक्बाल कासकरवरील कारवाईनंतर पाकिस्तानातून हस्तकांना भूमीगत होण्याचे दूरभाष

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्यावर खंडणी प्रकरणी ठाणे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर २८ सप्टेंबर २०१७ या दिवशी दोन दूरभाष संपर्क पाकिस्तानातून मुंबईत आले होते.

डेन्मार्कमध्येही बुरख्यावर बंदी

डेन्मार्कच्या संसदेने सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घातली आहे. यापूर्वी युरोपमधील फ्रान्स, बेल्जियम, नेदरलॅण्ड, बुल्गेरिया, जर्मनी आणि ऑस्ट्रिया यांनी बुरख्यावर बंदी घातली आहे.

(म्हणे) डोकलाम आमचा भाग !

डोकलाम पूर्वीपासून आमचा भाग राहिला आहे. तो आमच्या अधिकारक्षेत्रात येतो. येथे कोणताही वाद नाही. आमचे सीमा सुरक्षा दल नेहमीच येथे पहारा देत असते. सार्वभौमत्वाच्या सूत्रानुसार आमच्या भागाचे रक्षण करणे हा आमचा अधिकार आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

रोहिंग्या मुसलमानांनी लवकरात लवकर त्यांच्या देशात निघून जावे ! – बांगलादेश

रोहिंग्या मुसलमान ही म्यानमारची समस्या आहे आणि त्यावरचे उत्तर म्यानमारनेच शोधले पाहिजे, असे विधान बांगलादेशचे परराष्ट्र सचिव शहीदुल हक यांनी केले. बांगलादेशात थांबणे हा रोहिंग्यांपुढचा पर्याय असू शकत नाही. रोहिंग्या मुसलमानांनी लवकरात लवकर त्यांच्या देशात निघून जावे, असेही हक यांनी म्हटले आहे.

डोकलाममध्ये चीनकडून रस्तेबांधणी पुन्हा चालू !

जून मासात चीन आणि भारत या दोन देशांत भूतानच्या डोकलाम प्रदेशावरून वाद निर्माण झाला होता. चीनने येथे रस्तेबांधणी चालू केल्यावर भूतानच्या आवाहनानंतर भारताने चीनला विरोध करत हे बांधकाम थांबवले होते.

(म्हणे) ‘आयएस्आयचे आतंकवाद्यांशी संबंध असले, तरी समर्थन नाही !’ – पाक

पाकची गुप्तचर संस्था ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएस्आय)’चे आतंकवाद्यांशी संबंध आहेत; मात्र याचा अर्थ असा नाही की ती आतंकवादी संघटनांचे समर्थन करते, असे विधान पाक सैन्याकडून करण्यात आले आहे.

कुलभूषण जाधव यांच्या दयेच्या अर्जावर पाककडून लवकरच निर्णय

पाकने अटक केलेले आणि फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या दयेच्या अर्जावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे पाकच्या सैन्याने म्हटले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या शिक्षेवर स्थगिती आणली आहे.

बलुचिस्तानमधील दर्ग्यातील आत्मघातकी आक्रमणात १३ जणांचा मृत्यू

५ ऑक्टोबरला पाकच्या बलुचिस्तान प्रांतातील फतेहपूर दर्ग्यात झालेल्या आत्मघातकी आक्रमणामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला, तर २५ हून अधिक जण गंभीररित्या घायाळ झाले. लोक नमाजसाठी एकत्र आले होते, त्यावेळी हे आक्रमण झाले.

मुसलमानांना म्यानमारमधील बौद्ध संस्कृतीचा सर्वनाश करायचा होता ! – भिख्खू अशीन वीराथू    

म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांना या देशातील बौद्ध संस्कृतीची पाळेमुळे उखडून इस्लामी राज्य स्थापन करायचे होते. त्याचा विरोध करण्यासाठी आणि बौद्धांचे संरक्षण करण्यासाठी बौद्धांनी प्रतिकार केला

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now