भारताचा खरा इतिहास युवा पिढीला सांगणे आवश्यक ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
देशात पुन्हा भाषा, प्रांत भेद निर्माण केला जात आहे आणि आपण त्याला बळी पडत आहोत. हे टाळण्यासाठी देशाच्या इतिहासाचे पुनर्विलोकन करून ते तरुण पिढी पुढे मांडणे आवश्यक आहे. त्यातून स्वातंत्र्यासाठी आपण किती अभूतपूर्व मूल्य मोजले आहे, हे देशातील युवा पिढीला कळेल.