काल्पनिक व्यक्तिरेखांमध्ये रममाण होणारी मुले !

हॅरि पॉटरच्या काल्पनिक कथांमध्ये आणि त्याविषयीच्या चित्रपटांमध्ये मुले गढून जातात. हॅरि पॉटरची पुस्तके आणि चित्रपट यांमधील काल्पनिक व्यक्तिरेखांकडे मुले वास्तव म्हणून पहातात.

अभ्यासाचे तंत्र विकसित करा !

अभ्यासात मिळणारे यश हे बर्‍याचदा अभ्यास करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. आताच्या काळात अभ्यासाचे तंत्र मुले आणि पालक यांना माहिती असणे आवश्यक आहे.

गुन्हेगारी कथेच्या प्रभावामुळे अल्पवयीन मुलांकडून तरुणाची हत्या !

या मुलांना गुन्हेगारीच्या जगात प्रसिद्ध व्हायचे होते. त्यांनी स्वतःची गुन्हेगारी टोळीही बनवली होती. ‘पुष्पा’ आणि ‘भौकाल’ यांसारखे चित्रपट अन् ‘वेब सीरिज’ यांत चित्रित केलेल्या गुंडांच्या जीवनशैलीचा आमच्यावर प्रभाव आहे’, असे या अल्पवयीन आरोपींनी पोलिसांना सांगितले.

राष्ट्र आणि धर्माभिमानी बालके हवीत !

‘बालसंस्कार’ विषय आल्यावर राष्ट्राचे भावी नागरिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ‘बालक-युवक सक्षम, तर राष्ट्र सक्षम’ असा सरळ संबंध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणी त्यांच्या वीरमाता जिजाबाई यांनी त्यांच्यावर रामायण-महाभारत यांतील कथा सांगून संस्कार केले.

मुलांचे संगोपन म्हणजे त्यांचे लाड करणे नव्हे !

सकाळी नित्यकर्म आटोपल्यावर देवासमोर हात जोडायला उभे रहाणारी लहान मुले अभावानेच आढळतील, अशी बिकट स्थिती आहे. या कृतीऐवजी त्यांच्या हातात भ्रमणभाष असतो अथवा दूरचित्रवाणी चालू करून कार्टून पाहून दिवसाचा आरंभ केला जातो. यामध्ये किती घंटे वाया जातात ? आणि त्याचा आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो ?

दुर्बल हिंदू आणि धर्मांतर !

हिंदु मुलांमध्‍ये भिनवले जाणारे हिंदुद्वेषाचे विष रोखण्‍यासाठी धर्माचरण करणे आणि धर्मशिक्षण घेणे हाच पर्याय !

व्‍यायामासाठी वेळ द्या !

निरोगी आरोग्‍याची किल्ली म्‍हणजे आयुर्वेद आणि आयुर्वेदानुसार दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग म्‍हणजे योगाभ्‍यास किंवा व्‍यायाम. त्‍यामुळे प्रत्‍येकाने निरोगी आयुष्‍यासाठी आयुर्वेदानुसार दिनचर्या ठेवण्‍याचा प्रयत्न करून नियमित काही वेळ योगाभ्‍यासाला किंवा व्‍यायामाला देणे अत्‍यावश्‍यक आहे.

पंढरीची वारी : महाराष्ट्राचे ऐश्वर्य आणि वडिलोपार्जित वारसा !

पंढरीची नित्‍य वारी, गळ्‍यात तुळशीची माळ, संप्रदायाला प्रमाणभूत असलेल्‍या ग्रंथांचे वाचन, पठण, नामस्‍मरण नामसंकीर्तन, विठ्ठल हेच दैवत, सहिष्‍णुता, सदाचार, शाकाहार, व्‍यसनहीनता ही वारकरी पंथाची काही वैशिष्‍ट्ये सांगता येतील.

पावसाळ्‍यात तुळशीची लागवड करण्‍यासाठी तुळशीच्‍या मंजिर्‍या जमवून ठेवाव्‍यात !

येत्‍या पावसाळ्‍यात तुळशीची लागवड करण्‍यासाठी प्रत्‍येकाने तुळशीच्‍या वाळलेल्‍या मंजिर्‍या गोळा करून ठेवाव्‍यात. तुळशीच्‍या लागवडीविषयीची माहिती, तसेच तिचे औषधी गुणधर्म सनातनचा ग्रंथ ‘जागेच्‍या उपलब्‍धतेनुसार औषधी वनस्‍पतींची लागवड’ यात दिली आहे.