जनता उपाशी, लोकप्रतिनिधी तुपाशी !

कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णालयात भरती झालेल्या सामान्य नागरिकांना अक्षरश: घर-दार विकून रुग्णालयांची देयके द्यावी लागत होती आणि दुसरीकडे मंत्री, नगरसेवक यांनी सरकारकडून देयके घेणे, हा एक प्रकारे सरकारी तिजोरीवर मारलेला डल्लाच आहे !

संस्कारांचे बाजारीकरण नको !

धर्मशिक्षण न दिल्याने विवाह संस्कारासारख्या सुंदर संस्कारांचे बाजारीकरण होऊन अनेकांचे जीवन, तर कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. हे बाजारीकरण थांबवण्यासाठी आणि संभाव्य तोटे लक्षात घेऊन सरकारने आतातरी मुलांना लहानपणापासूनच धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था करावी.

कौटुंबिक छळ का ?

‘राज्य महिला आयोगा’ने उपाययोजनांसमवेत धर्मशास्त्र समजून घेऊन महिलांसह संपूर्ण कुटुंबाला साधना करण्यास प्रवृत्त केल्यास खऱ्या अर्थाने समस्या सुटतील. यासाठी संबंधितांनीही साधना करून अनुभूती घेतल्यास याचे प्रबोधन चांगल्या प्रकारे होईल, हे निश्चित ! सरकारने यामध्ये लक्ष घालून हिंदूंना धर्मशिक्षण कसे मिळेल, याकडे लक्ष दिल्यास खरा विकास होईल.

इंग्रजीच्या बेडीत अडकलेली ‘मराठी’ !

साहित्य, पत्रकारिता, सामाजिक माध्यमे, प्रशासन, शासन या प्रत्येक ठिकाणी आणि सामान्य नागरिकही मराठी बोलतांना सर्रास इंग्रजी शब्दांचा वापर करतांना आढळतात.

रेल्वेतील कुचकामी सुरक्षाव्यवस्था !

रात्रीच्या वेळी तरुण शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती का केली जात नाही ? तरुणांमध्ये असणारे धाडस आणि शारीरिक क्षमता तुलनेने वयस्करांमध्ये अल्प होत जाते, हे वरिष्ठांनी लक्षात घ्यायला हवे. ‘केवळ दाखवण्यासाठी पोलिसांची नियुक्ती केली आहे’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार !

कीर्तनकारांनी समाजात जागृती आणि प्रबोधन करून अध्यात्मप्रसार अन् प्रबोधन यांचे कार्य केले आहे. आजही कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार आहे. त्यामुळे कीर्तनकार सांगत असलेल्या कीर्तनाचा मतीतार्थ समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करण्यातच स्वहित आहे.

रिक्शाचालकांकडून लूट !

वर्ष २०१२ नंतर राज्यात सर्वच रिक्शांना ‘डिजिटल मीटर’ची सक्ती करण्यात आली. यानंतर अनेक शहरांमध्ये प्रवाशांना योग्य दरात प्रवास करता येईल, अशी अपेक्षा होती; मात्र सध्या तरी हे चित्र उलटेच पहायला मिळत आहे.

अग्नीशमन प्रशिक्षण आवश्यक !

येणाऱ्या भीषण आपत्काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. त्या वेळी स्वतःसह कुटुंबियांच्याही जीविताचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. यासाठी प्रत्येकानेच अग्नीशमन प्रशिक्षण घेणे, हे केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नव्हे, तर अन्य वेळीही उपयुक्त आहे.

हिंदूंवर पक्षपाती कारवाई !

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे भगवा झेंडा लावल्यानंतर धर्मांधांनी त्याला आक्षेप घेऊन शहरात दंगल घडवली.

नूतन संमेलनाध्यक्षांच्या समोरील आव्हाने !

संमेलन हे साहित्यजनांना न्याय देणारे, मराठीसाठी ठोस प्रयत्नशील असणारे, श्री सरस्वतीपूजनाची परंपरा परत चालू करण्याची संधी असलेले, असे होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. ९५ व्या संमेलनाध्यक्षांना ‘हे संमेलन किमान भाषिक उत्कर्षासाठी व्हावे’, यासाठीच झटावे लागेल !