महिला वारकऱ्यांची कुचंबणा !

महिलांसाठी न्हाणीघरांची आणि अधिकाधिक फिरत्या स्वच्छतागृहांची सोय, स्तनदा मातांसाठी तात्पुरता निवारा शेड, तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला हेल्पलाईन क्रमांक मंदिर परिसराच्या दर्शनी भागात किंवा मुक्कामाच्या ठिकाणी लावल्यास महिलांची वारीही सुखकारक होईल !

अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई हवीच !

याला संबंधित अधिकारी उत्तरदायी असल्यामुळे त्यांच्याकडून आतापर्यंत झालेली हानीभरपाई वसूल केली पाहिजे. तसेच काम न करणाऱ्यांना बडतर्फ करून त्यांच्यावरही फौजदारी कारवाई केली पाहिजे. अन्यथा अवैध नळजोडणीचे प्रकार कधीही थांबणार नाहीत.

अपयशाकडे कसे पहाल ?

जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी अपयशाला सामोरे जावे लागते. लहानपणापासूनच अपयशाकडे कसे पहायचे ? हे मुलांना शिकवल्यास संपूर्ण जीवनात कधीही अपयश पदरी पडले, तरी मुले डगमगणार नाहीत किंवा आत्महत्येसारखे पाऊल उचलणार नाहीत, हे नक्की !

लालूचशाही नव्हे ना ?

‘लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेली व्यवस्था ’, हे कागदावरच आहे, जनताही अधिक पैसे देणाऱ्या उमेदवाराला मत देते किंवा मतदानच करत नाही. ‘योग्य व्यक्ती निवडण्याचा पर्याय जनतेकडे नाही’; कारण बहुतांश उमेदवार हे स्वकर्तृत्वावर निवडून येऊ शकत नाहीत, अशी केविलवाणी स्थिती आहे.

समुपदेशनासह ‘साधना’ शिकवा !

साधनेमुळे ईश्वरी कृपा होते. त्याचा जीवनामध्ये अनेक अंगांनी लाभ होतो. साधना म्हणजे नामजपाद्वारे भगवंताची भक्ती करणे. साधनेमुळे जीवनाचा खरा अर्थ समजतो. त्यामुळे व्यक्तीला कुठलाही प्रसंग हाताळण्यासाठी बळ मिळते, विचारांमध्ये प्रगल्भता येते. हिंदु राष्ट्रात सर्वांना साधना शिकवली जाईल.

मावळ्यांचे विडंबन थांबवा !

छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणजेच महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाचा बघण्याचा आपला अभिमान कृतीतून दिसला पाहिजे. याउलट विदेशात अगदी अलीकडच्या काळातील ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसाही प्रेमाने जपला जातो. हिंदु राष्ट्रात असे अपप्रकार नसतील !

आदर्श उपायुक्त कीर्ती जल्ली !

महिला आहेत; म्हणून कुठेही सवलत न घेता उलट आदर्श कृती कशी असावी ? हे दाखवून देणाऱ्या कीर्ती जल्ली यांचा आदर्श अन्य प्रशासकीय अधिकारी घेतील का ?

मानसिक अतिक्रमण दूर करा !

निसर्गाच्या प्रकोपाला बऱ्याच अंशी मानवच उत्तरदायी आहे. हे सर्व चित्र पालटण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !

बनावट मूत्रपिंड प्रत्यारोपण !

समाजमनाची गुन्हेगारी वृत्ती पहाता कडक शिक्षेची कार्यवाही होणे आवश्यक आहे, तसेच त्या त्या क्षेत्रातील प्रामाणिक व्यक्तींनी आपल्या क्षेत्रातील गैरप्रकार रोखण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. जनतेला धर्मशिक्षण न दिल्याने ‘स्वतः योग्य वागण्यासमवेत इतरांनाही अयोग्य कृती करण्यापासून थांबवणे’, याचे महत्त्व लक्षात येत नाही. यामुळेच सर्व क्षेत्रांतील गुन्हेगारी वाढत आहे.

शिरस्त्राण सक्ती ?

जनतेची मनमानी आणि शासनकर्त्यांची कचखाऊ वृत्ती हीच खरी देशाच्या विकासात खर्‍या अर्थी अडथळा आहे. हे देशासाठी चिंताजनक आणि दुर्दैवी आहे.