मानसिक अतिक्रमण दूर करा !

निसर्गाच्या प्रकोपाला बऱ्याच अंशी मानवच उत्तरदायी आहे. हे सर्व चित्र पालटण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !

बनावट मूत्रपिंड प्रत्यारोपण !

समाजमनाची गुन्हेगारी वृत्ती पहाता कडक शिक्षेची कार्यवाही होणे आवश्यक आहे, तसेच त्या त्या क्षेत्रातील प्रामाणिक व्यक्तींनी आपल्या क्षेत्रातील गैरप्रकार रोखण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. जनतेला धर्मशिक्षण न दिल्याने ‘स्वतः योग्य वागण्यासमवेत इतरांनाही अयोग्य कृती करण्यापासून थांबवणे’, याचे महत्त्व लक्षात येत नाही. यामुळेच सर्व क्षेत्रांतील गुन्हेगारी वाढत आहे.

शिरस्त्राण सक्ती ?

जनतेची मनमानी आणि शासनकर्त्यांची कचखाऊ वृत्ती हीच खरी देशाच्या विकासात खर्‍या अर्थी अडथळा आहे. हे देशासाठी चिंताजनक आणि दुर्दैवी आहे.

‘ऑनलाईन’ जुगार थांबवा !

‘भरघोस आर्थिक उत्पन्नासाठी राष्ट्र रसातळाला गेले तरी चालेल’, ही वृत्ती सध्या जोर धरत आहे. त्यामुळे सरकारने ऑनलाईन जुगार थांबवण्याविषयी योग्य ती कठोर पावले उचलायला हवीत, अन्यथा जुगारामुळे होणारे सामाजिक दुष्परिणाम भयावह असून त्यामुळे राष्ट्राची सर्व प्रकारे हानी होऊ शकते. असे झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ?

शिस्तच हवी !

भारतातील लोकसंख्या पहाता जनतेला स्वयंशिस्त लावायची असेल, तर धर्मशिक्षण दिल्यास प्रत्येकाला स्वतःचे कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडण्याचे महत्त्व लक्षात येईल. यातून जनतेची आध्यात्मिक उन्नतीही होईल आणि तिला शिस्तही लागेल. अशा प्रकारचे वातावरण हिंदु राष्ट्रात असेल !

महिलांनो, भक्ती वाढवा !

महिलांनो, धर्मांध, वासनांध आणि रज-तमाने भरलेल्या जगात केवळ श्रीकृष्णच संरक्षण करू शकतो. कोणत्याही वेळी, कुठेही आणि कधीही तोच साहाय्यासाठी कुणालाही पाठवू शकतो. त्यामुळे क्रियमाण म्हणून स्वरक्षणासाठी कराटे, लाठी-काठी यांचे प्रशिक्षण घेऊन भक्ती वाढवूया.

शहरांचे नामकरण कधी ?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगाबाद, उस्मानाबाद आणि इस्लामपूर या शहरांचे नामकरण देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होऊनही होत नसेल, तर आपण छत्रपती शिवाजी महाराज अन् छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या आदर्शाप्रमाणे वाटचाल करू शकू का ? त्यांच्यासारखा पराक्रम गाजवू शकू का ?

विवाह संस्काराचे बाजारीकरण नको !

पवित्र असा विवाह संस्कार हा धार्मिक न रहाता व्यवसायाचे माध्यम बनत चालला आहे, हे अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहे. जनतेला धर्मशिक्षण न दिल्यामुळे ती किती प्रमाणात भ्रष्ट झालेली आहे, याचे उदाहरण आहे.

आदर्श पत्रकारिता हवी !

वास्तविक राज ठाकरे लोकप्रतिनिधी असल्याने ते सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. असे असतांनाही त्यांचे ‘जगू द्याल कि नाही ?’, हे वाक्य प्रसिद्धीमाध्यमांप्रतीची त्यांची उद्विग्नता दर्शवते. या प्रसंगातून ‘टी.आर्.पी.’ वाढवण्यासाठी किंवा ‘ब्रेकिंग न्यूज’च्या मागे लागलेल्या माध्यमांना कशाचेही भान राहिले नाही, हेच दिसून येते.

भजन स्पर्धेच्या जोडीला धर्मशिक्षण द्या !

धर्मशास्त्रानुसार हिंदूंनी कुलदेवतेची उपासना करणे आवश्यक आहे. यामुळे अंतर्मनातील अयोग्य संस्कार नष्ट होण्यास साहाय्य होते. त्यामुळे शासनाने भजने आणि अभंग स्पर्धांच्या जोडीला बंदीवानांना धर्मशिक्षण देण्याचे नियोजन करावे, सर्वांनाच धर्मशिक्षण देणे अन् कठोर शिक्षेची प्रभावी कार्यवाही करणे अपरिहार्य आहे !