काळ्या रंगाचे कपडे नकोत !

अन्य कोणतेही रंग एकमेकांत मिसळले जातात; पण काळा रंग कधीच मिसळला जात नाही. काळ्या रंगाला अधिक महत्त्व दिले जाणे, यातून धर्मशिक्षणाविषयीचे अज्ञान दिसून येते. आपण नकारात्मक स्पंदने ग्रहण करायची ? कि सकारात्मक स्पंदने ग्रहण करून आनंदी व्हायचे ? हे प्रत्येकाने ठरवावे.

आवश्यकता आहे सुसंस्कारांची !

सध्याची शिक्षणपद्धत, एकत्र कुटुंबपद्धतीचा अभाव, पाश्चात्त्य विकृतीचा वाढता प्रभाव या गोष्टीही मुले बिघडण्यास कारणीभूत ठरत आहेत. यामुळे मुले भरकटली आहेत. खरेतर या युवाशक्तीच्या बळावरच भारत विश्वशक्ती बनू शकतो.

अवैध ‘होर्डिंग्ज’वर कारवाई अत्यावश्यक !

या समस्येच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाला कठोर कारवाई करावीच लागेल, त्याचसमवेत प्रत्येक शहरातील लोकप्रतिनिधी आणि नेते यांनीही स्वत: पुढाकार घेऊन असे फलक लागणार नाहीत, हे कसोशीने पाळले पाहिजे. असे झाले, तरच ही समस्या काही प्रमाणात सुटेल !

पितृपक्ष : धर्मशास्त्रीय आधार असलेला श्रद्धेचा विषय !

पितृपक्षातील ‘श्राद्ध’ हा धर्मशास्त्रीय आधार असलेला श्रद्धेचा विषय आहे. यासाठी धर्मशिक्षण घेऊन या विधींची अनुभूती घेऊया. जर कुणी विनोद करत असेल, तर त्याचेही प्रबोधन करून धर्मरक्षण करूया !

पितृऋण, कृतज्ञता आणि कर्तव्य !

श्राद्धविधी करतांना आपण मनात ‘पूर्वजांचे आपल्यावर असलेले ऋण, त्याविषयीची कृतज्ञता आणि आपले कर्तव्य’, असा विचार करून ते केले, तर आपल्याकडून ते अधिक मनोभावे आणि श्रद्धेने होतील.

श्री गणेशमूर्ती विसर्जनातील अक्षम्य चुका !

आता काही दिवसांवर नवरात्र आहे. त्यात युवावर्गाचा सहभाग अधिक असतो. गणेशोत्सवात पहायला मिळालेला अयोग्य भाग नवरात्रोत्सवात पहायला मिळू नये आणि उत्सवात धार्मिकता असावी, थिल्लरपणा नकोच, हेच या निमित्ताने सांगणे !

वाहतूक कोंडीची जटील समस्या !

वाहतूक कोंडीचे प्रश्न वेळीच न सोडवण्यासमवेत वाहनांच्या वाढत्या संख्येकडेही लक्ष द्यायला हवे. देशात ४ माणसांच्या कुटुंबामध्ये ८ गाड्या असे चित्र थोड्याफार फरकाने सर्वत्र पहायला मिळते. येथे एका कुटुंबात एवढ्या वाहनांची आवश्यकता आहे का ? याचाही विचार व्हायला हवा.

‘लव्ह जिहाद’ प्रकरणी पोलीस गप्प का ?

पोलिसांनी ‘लव्ह जिहाद’च्या प्रवृत्तीकडे दुर्लक्ष केल्यास उद्या त्यांच्या मुलीही त्याला बळी ठरण्याची शक्यता नाकारता येईल का ? ‘लव्ह जिहाद’चा प्रकार समाजातून नष्ट करण्यासाठी पोलीस असंवेदनशील का ? हा प्रश्न त्यामुळे समाजासाठी अनुत्तरितच आहे !

‘पीक विमा योजने’चा पांढरा हत्ती !

प्रतिवर्षी शेतपिकांची हानी होत असतांना पीक विमा आस्थापने तोट्यात असायला हव्या होत्या; पण त्या नफ्यात असल्याचे दिसून येत आहे ! शासनाने ज्या शेतकर्‍यांची खरोखर हानी होत आहे, त्यांना लाभ कसा मिळवून देता येईल, तसेच या सरकारी योजनांचा अपलाभ घेणार्‍यांवर कठोर कारवाई करावी.

धर्माभिमान जागृत करूया !

हिंदूंनी साधना आणि धर्माचरण केल्यासच त्यांना सण-उत्सव कसे साजरे करावेत ? हे लक्षात येईल आणि त्यांच्यातील धर्माभिमान जागृत झाल्यास अशा प्रकारे चुकीच्या कृती त्यांच्याकडून होणार नाहीत.