संतपिठांची आवश्यकता !

भारतियांनाही निधर्मीपणाच्या मागे न लागता आध्यात्मिक सामर्थ्याचे महत्त्व लक्षात घेऊन स्वतःचे जीवन आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी स्वतःच धर्मशिक्षण घेऊन ते आचरणात आणणे आवश्यक आहे ! भारताला आध्यात्मिक वारसा आहे. संतपिठांच्या माध्यमातून तो पुढेही जपला जाईल, हे नक्की !

‘वन्दे मातरम् !’

सांस्कृतिक आक्रमण मोडून काढण्यासाठी केवळ शासकीय कर्मचार्‍यांनीच नाही, तर सामान्य नागरिकांनीही एकमेकांशी बोलतांना ‘वन्दे मातरम्’ म्हणणे अत्यावश्यक आहे ! हे म्हणणे इतके मोठ्या प्रमाणात वाढले पाहिजे की, त्याचे चळवळीत रूपांतर होऊन हिंदुद्रोह्यांना धडकी भरली पाहिजे !

भाविकांच्या जिवाशी खेळणारा पुरातत्व विभाग !

‘केवळ हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी प्रश्न निर्माण झाल्यावर पुरातत्व विभाग निष्काळजीपणाचे धोरण राबवतो’ ! हा एक प्रकारे भाविकांच्या जिवाशी चाललेला खेळच आहे. हा खेळ खेळणार्‍या पुरातत्व विभागातील अधिकार्‍यांना कठोर शिक्षा करा, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य ते काय ?

बेरोजगारीचा उच्चांक !

शिक्षकांची कमतरता, त्यांचे लांबणारे वेतन, निदर्शने आणि दळणवळण बंदी आदी कारणे यामागे होती; पण त्यामुळे आपण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहोत, असे शासनाला वाटत नाही, असेच दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.

‘शेती’ शिक्षण : विकासासाठी आवश्यक !

महाराष्ट्रात लवकरच इयत्ता ५ वीपासून ‘शेती’ हा विषय शिकवला जाणार आहे. विशेषतः ग्रामीण भागांतील शाळेत शिकणारे बहुसंख्य विद्यार्थी ही शेतकर्‍यांचीच मुले आहेत. ‘पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी मिळत नाही.

हिंदूंनो, जागे व्हा !

‘राजकीय पक्ष आणि पोलीस हिंदूंचे रक्षण करतील’, अशी आशा हिंदूंनी करू नये. जिहादी संघटना, लव्ह जिहाद, हलाल यांच्या विरोधात हिंदूंनीच संघटित होऊन वैध मार्गाने लढा देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भगवंताचे अधिष्ठान ठेवून कृती केल्यास यश नक्की मिळेल !

भोगवादी संस्कृती नको !

पुण्यात सध्या पबची विकृती वाढत आहे. पब, नाईट क्लब यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकृत्ये, तसेच अनेक अवैध धंदे चालतात. महाविद्यालयीन विद्यार्थी हेच देशाचे भवितव्य आणि तेच भावी पिढीचे आदर्श असणार आहेत. त्यांना नशेच्या जाळ्यात ओढण्याचा प्रकार जाणूनबुजून होत आहे का ?

नवरात्रीचे बाजारीकरण थांबवा !

हे सर्व प्रकार धर्मशिक्षण आणि राष्ट्रप्रेम यांच्या अभावामुळे घडत आहेत. हिंदूंच्या उत्सवांचे पावित्र्य राखण्याचे दायित्व समाजातील प्रत्येक घटकांवर आहे. समाजाने शास्त्र समजून घेऊन नवरात्रीत देवीची उपासना करण्यास प्राधान्य दिल्यास म्हणजेच धर्माचरण केल्यास उत्सवांना परत मूळ स्वरूप प्राप्त होईल !

देवीची कृपा संपादन करूया !

कृतज्ञताभावाने व्यष्टी आणि समष्टी स्तरावर राष्ट्र अन् धर्म यांची सेवा करून आपल्या जन्मदात्या शक्तीला आपण कृतज्ञतारूपी पुष्प अर्पण करूया. छत्रपती शिवरायांनी स्वतःचे आयुष्य जगदंबेसाठी समर्पित केले, तो आदर्श ठेवून आपणही आई जगदंबेची सेवारूपी भक्ती करून नवरात्रीमध्ये तिची कृपा संपादन करूया !

उत्सवांचे महत्त्व समजून घ्या !

नवरात्रोत्सव म्हणजे आपल्यातील श्री दुर्गादेवीची शक्ती जागृत करणे ! देवीची कृपा संपादन करून घेण्यासाठी गरबा खेळणे. गरबा खेळतांना आपण स्वतःला विसरून देवीच्या भजनात रममाण होणे, तिला अनुभवणे ! आपल्यातील शक्तीतत्त्व जागृत करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध होणे, ही हिंदु संस्कृती आहे.