प्रार्थना आणि श्रद्धेचे बळ !

लंपी रोगापासून गायींचा बचाव होण्यासाठी श्री. महादेव देसाई यांनी द्वारकाधीश श्रीकृष्णाला नवस केला. ‘जर माझ्या गायी वाचल्या, तर मी तुझ्या दर्शनाला माझ्या २५ गायींसह चालत येईन.’ जेव्हा सगळ्याच गायी वाचल्या, तेव्हा ते द्वारकाधीश मंदिरात दर्शनासाठी (अंतर ४५० कि.मी.) आपल्या गायींसमवेत आले.

भ्रमणभाषच्या अतीवापराने आरोग्य बिघडू देऊ नका !

व्यक्तीचे मानसिक आरोग्य चांगले असेल, तरच तो अनेक गोष्टी करू शकतो. मानसिक स्थितीच नीट नसेल, तर अन्य गोष्टी असून नसून सारख्याच आहेत. यातून मानसिक स्वास्थ्यासाठी अध्यात्माची कास धरणे अनिवार्य आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होते !

केवळ जनजागृती नको !

संपूर्ण जग शिक्षेच्या भीतीपोटी योग्य वागते. त्यामुळे तंबाखू नियंत्रणासाठी केवळ जनजागृती करून नाही, तर कायद्याची कठोर कार्यवाही होणेच आवश्यक आहे. आतातरी प्रशासन याचा गांभीर्याने विचार करून कठोर शिक्षा करणे अवलंबेल का ?

वाहतुकीचे नियम शालेय अभ्यासक्रमात घ्या !

वाहतुकीचे नियम पाळले जावेत, यासाठी शालेय अभ्यासक्रमात याचा समावेश हवा. यामुळे नव्या पिढीवर वाहतुकीचे नियम आणि शिस्त यांचे संस्कार होतील, तसेच प्रत्येकाला आपल्या प्राणाची अन् इतरांच्या प्राणाची किंमत असणेही महत्त्वाचे आहे. हे सर्व प्रबोधन शालेय जीवनातून होणे आवश्यक !

साहित्यिकांची वैचारिक दिवाळखोरी !

ज्या कंपूचे मराठीसाठी विशेष योगदान नाही आणि केवळ ‘हिंदुत्वा’ला लक्ष्य करण्यासाठी राहुल यांच्या राजकीय यात्रेला पाठिंबा देतात, अशा कथित साहित्यिकांचा खरा चेहरा या निमित्ताने समोर आला. अशा बेगडी साहित्यिकांना या कृतीसाठी जाब विचारण्याची योग्य संधी मिळाल्यावर सोडता कामा नये, इतकेच !

बलात्कार्‍याला भर चौकातच फाशी द्या !

मुळात कायदा किंवा गुन्ह्यासाठी होणारी शिक्षा यांचे भय गुन्हेगारांमध्ये नाही. गुन्हेगारांच्या मनात शिक्षेची जरब निर्माण होण्यासाठी बलात्कार्‍याला कठोर शिक्षा आणि शिक्षेची प्रभावी कार्यवाही होणे आवश्यक आहे.

भ्रमणभाष : लाभ कि हानी ?

भ्रमणभाषमुळे व्यवहारात जेवढा लाभ होतो, तेवढाच तोटाही होत आहे. यातून एक भाग अधोरेखित होतो, तो म्हणजे विज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी त्याचा वापर करण्यासाठी मनुष्याने विवेकी असणे आवश्यक आहे. मनुष्याचा विवेक जागृत रहाण्यासाठी धर्माचरण आवश्यक आहे.

धर्मशास्त्रानुसार कृती करणे आवश्यक !

हिंदूंच्या सण-उत्सव प्रसंगी शिवपिंडीवर काही लिटर दुधाचा अभिषेक केला की, झोपी गेलेले पुरो(अधो)गामी जागे होतात. ते १५१ लिटर दुधाचा अभिषेक केल्यावर ‘ब्र’ही काढत नाहीत. हिंदूंनो, धर्मविसंगत कृती न करता धर्मशास्त्र समजून कृती करा !

चोरी करणारी जनता नको !

‘यथा राजा तथा प्रजा’, या उक्तीप्रमाणे प्रत्येक प्रभागाचा लोकप्रतिनिधी हा धर्माचरणी असेल, तर प्रजा आपोआप धर्माचरण करील. कष्टाने मिळवून न खाता चोरून खाण्याची मानसिकता ठेचायची असेल, तर त्यासाठी कायद्याची प्रभावी आणि चोख कार्यवाही हवी !

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ नको !

निर्णयप्रक्रियेतील दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण करिअरवर परिणाम होऊ शकतो, तसेच त्यांचे मानसिक खच्चीकरणही होते. हे सर्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा चांगला राखणे आवश्यक आहे.