शिक्षणाचे तीनतेरा !

बिहार राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नपत्रिकेत काश्मीर हा वेगळा देश असल्याच्या गृहितकावरून प्रश्‍नही विचारण्यात आला. परीक्षेत असा प्रश्‍न विचारणे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना काश्मीरविषयी पुरेशी माहिती आहे, अशा विद्यार्थ्यांना गोंधळात पाडून त्यांचा परीक्षेतील अमूल्य वेळ वाया घालवणे.

कम्युनिस्ट नीती !

चीनमध्ये सरकारच्या धोरणापुढे कोणाचे काहीच चालत नाही, याचा अनुभव नुकताच आला आहे. आपल्या देशाच्या दृष्टीने ‘चीन’ हा सध्या एक ‘विषय’ आहे. भूतानच्या डोकलाम प्रदेशावरून चीन हा सध्या चर्चेचा विषय आहे. येथे एक नमूद करायला हवे की, जगभर कितीही चर्चा रंगोत, चीन त्याला हवे ते करत असतो.

‘तोकडे’ विचार !

राजकारणात ताळतंत्र सुटले की काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेसचे युवराज राहुल गांधी सध्या करत असलेली वक्तव्ये. ‘संघात किती महिला आहेत ? संघाच्या शाखांवर महिलांना हाफ पॅन्टमध्ये पाहिले आहे का ?’, असे अतिशय अश्‍लाघ्य वक्तव्य त्यांनी केले.

संघटित हिंदूंचे सीमित यश !

पुण्यातील चिंचवडजवळील देहु-आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या प्रवेशद्वारावरील मोशी गावात पुन्हा एकदा होऊ घातलेला तरुणांना विकृत आणि व्यसनी बनवणारा, आपल्या तेजस्वी संस्कृतीला झाकोळायला निघालेला ‘सनबर्न’ महोत्सव महाराष्ट्र राज्य पर्यटन खात्याला रहित करावा लागला.

सर्वांचेच सण प्रदूषणमुक्त हवेत !

देहलीसह एन्सीआर् येथे प्रदूषणामुळे फटाके विकण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे, हा अत्यंत स्तुत्य निर्णय आहे. पूर्वीपासूनच शासनाने भयावह प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले असते, तर आज ही वेळ आली नसती.

देवधनाचा योग्य विनियोग हवा !

राज्यातील गरजवंत मुलांच्या शिक्षणासाठी गणेशोत्सव मंडळांनी त्यांच्या एकूण मिळकतीमधील १० टक्के रक्कम आर्थिक साहाय्य म्हणून द्यावी, असे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी आवाहन केल्यावर मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने आणि पुण्यातील प्रसिद्ध ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळा’ने लगोलग हे पैसे आयुक्तांकडे सुपूर्द केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले.

‘फवारणी’ संकट !

यवतमाळमध्ये कीटकनाशके फवारतांना झालेल्या विषबाधेमुळे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकर्‍यांची संख्या २० झाली आहे, तर ६०० पेक्षा अधिक शेतकरी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

ऑस्ट्रेलियातील निदर्शने !

ऑस्ट्रेलियात सध्या अदानी या भारतीय उद्योगसमूहाच्या विरोधात जोरदार निदर्शने चालू आहेत. अदानी समूहाच्या तेथील प्रस्तावित खाणउद्योगामुळे पर्यावरणाला निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन सहस्रो लोक रस्त्यावर उतरले आहेत. भारतातही अनेक विघातक कारखाने, पर्यावरणविरोधी प्रकल्प सर्रास चालू आहेत. त्याला विरोधही अल्प-अधिक प्रमाणात होत असतो.

देशभक्ती प्रगट करण्याचा क्षण !

हिंदूंचा दीपावली हा उत्सव जवळ येऊन ठेपला आहे. हा उत्सव आणि फटाके यांचे जवळचे नाते आहे. दीपावलीच्या काळात मुले फटाके वाजवण्यात करमणुकीचे साधन पहातात.

सामर्थ्यशाली सैनिक !

पाकच्या अण्वस्त्रसज्जतेविषयी जागतिक पातळीवर चिंता व्यक्त होत असते. पाककडे भरपूर अण्वस्त्रे असून ती तेथील आतंकवाद्यांच्या हाती लागण्याची आणि त्यामुळे मोठा संहार होण्याची भीती व्यक्त केली जात असते.


Multi Language |Offline reading | PDF