पुन्हा एकदा आरंभ !

‘संपूर्ण देशात हिंदु पीडितांना संरक्षण कसे मिळेल ?’, हे पहावे लागेल. त्याचसमवेत त्याला विरोध करणार्‍या हिंदुविरोधकांना शांत ठेवून राष्ट्रहित साधणे यासाठी सरकारचे कौशल्य पणाला लागेल ! नागरिकत्व सुधारणा कायद्याचा उद्देश समजून घेऊन त्यासाठी सरकारला संघटितपणे पाठिंबा द्यायला हवा !

उघड लव्ह जिहाद !

हिंदूंनीच आता मरगळ झटकून कंबर कसली पाहिजे. असे कार्यक्रम ही हिंदूंच्या सामूहिक धर्मांतराची केंद्रे बनतील आणि पुढे सहस्रोंच्या संख्येने हिंदूंचे धर्मांतर होत राहील. त्यामुळे अशा कार्यक्रमांविरुद्ध आणि एकूणच लव्ह जिहादसह धर्मावरील सर्व आघातांविरुद्ध वैध मार्गांनी लढा देणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्यच आहे.

झुलती व्यवस्था !

या घटनेच्या एक दिवस अगोदर घटनेशी साधर्म्य असलेले काही ट्वीट्स करण्यात आले होते. म्हणजे उद्या काय होणार आहे, हे आदल्या दिवशीच अप्रत्यक्षपणे सांगण्यात आले होते. तरीही पोलीस आणि प्रशासन ढिम्मच ! सत्य जनतेसमोर त्वरित आले पाहिजे, तरच हा अपघात होता कि घातपात ? हे कळू शकेल.

१३४ लोकांच्या मृत्यूला उत्तरदायी कोण ?

‘मोठ्या अपघातांमागील उत्तरदायींना शिक्षा होते’, असे कुणीही ठामपणे म्हणू शकत नाही. भारतियांची संवेदनशीलता काही घंटे किंवा काही दिवसांचीच असते. या घटनेविषयीही वेगळे काही होईल, असे म्हणणे धाडसाचेच ठरेल !

‘ट्विटर’ची ‘चिमणी’ मुक्त झाली !

ट्विटर खरेदी केल्यानंतर आणि तिघा अधिकार्‍यांची हकालपट्टी केल्यानंतर मस्क यांनी उगाच ट्वीट केले नाही, ‘चिमणी मुक्त झाली….चांगले दिवस येऊ देत !’ केवळ ट्विटरच नव्हे, तर सर्वच प्रकारच्या सामाजिक माध्यमांवरील साम्यवादी कीड नष्ट होऊन राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांना विचारस्वातंत्र्याचा अनुभव येणे आवश्यक आहे !

हाफिजला ‘खुदा हाफिज’ केव्हा ?

‘आतंकवादी कारवाया रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर अवलंबून रहाता येणार नाही’, हेच डॉ. जयशंकर यांनी एक प्रकारे सूचित केले आहे. देशाच्या भूमीत नियमित होणार्‍या आतंकवादी कारवाया रोखण्याच्या दृष्टीने भारतालाच राष्ट्रहितासाठी आवश्यक ती पावले उचलणे आवश्यक आहे.

चर्चमधील कुकृत्ये !

हिंदु धर्माला ‘धर्मद्वेषा’च्या चष्म्यातून पहाणारे ख्रिस्ती धर्मातील अपप्रकारांविषयी काहीच का बोलत नाहीत ? यातूनच त्यांचा ख्रिस्तीधार्जिणेपणा उघड होतो, हेच खरे ! हिंदु पुजार्‍यांच्या संदर्भात प्रत्येक स्तरावर विरोधात्मक भूमिका घेतली जाते; पण पाद्रयांची कोणतीही कृती ही समर्थनीय ठरवली जाते. ही धर्मद्वेषी मानसिकताच अशा घटनांचे मूळ आहे !

काँग्रेसचा देशविघातक तोंडवळा !

काँग्रेसने केलेल्या पापांची सूची करावयाची झाल्यास अनेक कागद अपुरे पडतील. प्रत्येक स्तरावर काँग्रेसचा देशविरोधी, हिंदुविरोधी, भ्रष्टाचारी तोंडवळा उघड होत असून नागरिकांनी आता देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचे विसर्जन करावे !

नेताजींना योग्य सन्मान हवाच !

‘भारताच्या चलनावरही महापुरुषांची प्रतिके असावीत’, असे राष्ट्रप्रेमींना वाटते. त्या अनुषंगाने हिंदु महासभेने सुचवलेले सूत्र मोदी शासनाने कृतीत आणले, तर नेताजींच्या कार्यासाठी देशाकडून वाहिलेली आदरांजली ठरेल, तसेच त्यांच्या वीरश्रीची चेतना जनतेत निर्माण होण्यास साहाय्य होईल !

‘ऋषी’राज !

ब्रिटनमध्ये आज जी अत्यंत बिकट आर्थिक स्थिती निर्माण झाली आहे, ती सावरण्यासाठी एक भारतीय वंशाची ‘ऋषी’ नाव असलेली व्यक्ती सज्ज झाली आहे, हा केवळ योगायोग नव्हे, तर ही कालगती आहे. भारतावर राज्य करणार्‍या ब्रिटिशांचा पंतप्रधान हिंदु वंशीय होणे, ही कालगतीच !