सूक्ष्म परीक्षणाच्या माध्यमातून केलेल्या संशोधनाला वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून केलेल्या संशोधनाची जोड !

सूक्ष्मातून १०० टक्के सत्य माहिती मिळण्याची क्षमता असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातूनही संशोधन केले. याचे कारण ‘आजकाल अनेक लोकांचा संतांच्या अनुभवसिद्ध ज्ञानापेक्षा वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवर अधिक विश्‍वास असतो’, हे आहे.

गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या सिमेंटच्या चौथर्‍यांवर स्थापित करण्यात आलेल्या गजमूर्तींचे आध्यात्मिक महत्त्व आणि कार्य

१५.१.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या सिमेंटच्या चौथर्‍यांवर पांढर्‍या रंगाच्या गजमूर्तींची स्थापना करण्यात आली आणि त्यांवर सूक्ष्मातून इंद्राचे आवाहन करण्यात आले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची काही अक्षरे लहान आणि अक्षरे वाचता येणार नाहीत, अशी होण्यामागील शास्त्र

ईश्‍वरी राज्य (हिंदु राष्ट्र) स्थापनेचे कार्य सप्तलोक आणि सप्तपाताळ यांच्याशी निगडित आहे. ईश्‍वरी राज्य स्थापनेसाठी आतापर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे उच्च लोकांशी निगडित समष्टी कार्याचे प्रमाण ४५ टक्के, तर भूलोकाशी निगडित समष्टी कार्याचे प्रमाण ५५ टक्के होते.

किन्नीगोळी येथील प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात ठाणे येथील श्री. प्रदीप चिटणीस यांनी सादर केलेल्या गायनाचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि प.पू. बाबांनी केलेले मार्गदर्शन !

१६.१२.२०१८ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने किन्नीगोळी येथील प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात ठाणे येथील गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी गायनसेवा सादर केली. त्या वेळी देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे देत आहे.

बेळगाव येथील पू. (डॉ.) नीलकंठ दीक्षित आणि सौ. विजया दीक्षित यांचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

१.४.२०१९ यादिवशी मी रामनाथी आश्रमातील पाहुण्यांच्या खोलीच्या समोरून निघतांना अचानक पुष्कळ गारवा आणि आनंद जाणवला. ‘खोलीत खडतर साधना करणारे संत किंवा भक्त निवासाला आहेत. त्यांच्या अस्तित्वामुळे अशी अनुभूती येत आहे’, असे सूक्ष्मातून जाणवले.

कै. शशिकांत राणे यांच्या मृत्यूत्तर सूक्ष्म लोकातील प्रवासाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

कै. राणेकाका यांचे पार्थीव तिरडीवर ठेवल्यावर त्याला भस्माचे लेपन केले. भस्मातील शिवतत्वयुक्त चैतन्यलहरींचा स्पर्श त्यांच्या पार्थिवाला होऊन त्यांच्या स्थूल आणि सूक्ष्म देहांची शुद्धी झाली. त्यांच्या लिंगदेहाच्या भोवती शिवतत्त्वमय चैतन्याचे संरक्षककवच निर्माण झाले होते.

गुढीपाडव्यानिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या गुढीपूजनाचे सूक्ष्म परीक्षण !

‘६.४.२०१९ या दिवशी हिंदूंच्या नववर्षारंभानिमित्त (गुढीपाडव्यानिमित्त) सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात विधीवत् गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सनातनचे साधक-पुरोहित श्री. चैतन्य दीक्षित यांनी गुढीचे पूजन केले

हनुमानचालीसा म्हणतांना साधना न करणार्‍या (सर्वसामान्य) व्यक्तीवर होणारे सूक्ष्मातील परिणाम !

व्यक्तीच्या देहाभोवती असलेले त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होणे : हनुमानचालीसेच्या पठणाने व्यक्तीवर आध्यात्मिक उपाय होत असल्याने असे होते.

भावजागृती झाल्यावर एकाच डोळ्यातून अश्रू वहाणे किंवा डोळ्यात पाणी स्थिर रहाण्यामागील कारण

‘प्रगट भावामुळे जिवाची भावजागृती झाल्यावर त्याच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी भावशक्ती प्रगट होते. या शक्तीचा प्रवाह जिवाची चंद्रनाडीकडून सूर्यनाडीकडे याप्रकारे असते. सूर्यनाडी आणि चंद्रनाडी दोन्हींमध्ये प्रगट भावशक्तीचा प्रवाह आरंभ झाल्याने सर्वसाधारणत: भावजागृती झाल्यावर जिवाच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू वहातात.

श्रीरामरक्षास्तोत्र भावपूर्ण म्हटल्याने होणारे लाभ

कोणतेही स्तोत्र म्हणजे त्या देवतेची केलेली काव्यात्मक प्रार्थना आणि स्तुती होय.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now