उच्च स्वर्ग लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५० टक्के आध्यात्मिक पातळीची सुलतानपूर (उत्तरप्रदेश) येथील कु. भाविनी द्विवेदी (वय ११ वर्षे) !

जून २०२३ मध्ये सुलतानपूर (उत्तरप्रदेश) येथील सौ. कुमुद अनुज द्विवेदी आणि त्यांची कन्या कु. भाविनी अनुज द्विवेदी (वय ११ वर्षे) काही दिवसांसाठी वाराणसी येथील सेवाकेंद्रात गेल्या होत्या, तेव्हा सौ. कुमुद यांना भाविनीचे जाणवलेले गुण आणि कु. भाविनीला वाराणसी सेवाकेंद्रातील ध्यानमंदिर अन् श्रीराममंदिर येथे आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

नेरळ (कर्जत, जिल्हा रायगड) येथील शास्त्रीय गायक श्री. धनंजय जोशी यांनी गीतरामायणातील एका भावगीताचे संस्कृत आणि मराठी भाषेत केलेल्या गायनाचे सूक्ष्म परीक्षण !

श्री. धनंजय जोशी यांनी पहिल्या प्रयोगात गीतरामायणातील ‘स्वये श्रीराम प्रभु ऐकती…’ या भावगीताचे संस्कृत भाषेत आणि दुसर्‍या प्रयोगात मराठी भाषेत गायन केले. तेव्हा मला सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांनी लिहिलेल्या ‘अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचे बोध’ या लघुग्रंथाच्या लोकार्पण सोहळ्याचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

पू. अनंत आठवले यांचे निर्गुणाच्या दिशेने मार्गक्रमण होत असून ते योगी किंवा ऋषिमुनी यांच्या समाधीसारख्या म्हणजे निर्विकार स्थितीत असल्यामुळे ‘त्यांच्याकडे पाहिल्यावर मन निर्विचार होत आहे’, असे मला जाणवले.

दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांमध्ये अध्यात्माच्या दृष्टीने उत्तम ग्रहयोग असण्यामागील कारणमीमांसा !

‘दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांतील आध्यात्मिक ग्रहयोगांचा अभ्यास करणे’, हा प्रस्तुत संशोधनाचा उद्देश आहे. १८ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘दैवी बालक म्हणजे काय ? आणि दैवी बालकांची वैशिष्ट्ये’ वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.   

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील चि. गायत्री सचिन नाईक (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. गायत्री सचिन नाईक ही या पिढीतील एक आहे !

स्त्रियांनी कपाळावर कुंकू लावल्याने त्यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे

कुंकवातून प्रक्षेपित होणार्‍या तारक-मारक चैतन्यामुळे वाईट शक्तींना स्त्रियांच्या आज्ञाचक्रातून शरिरात प्रवेश करण्यात अडथळा निर्माण होतो. कुंकवामुळे स्त्रियांच्या भोवती चैतन्याचे कवच निर्माण होत असल्याने त्यांचे वाईट शक्तींपासून रक्षण होते.

दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांमध्ये अध्यात्माच्या दृष्टीने उत्तम योग असणे !

दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांतील आध्यात्मिक ग्रहयोगांचा अभ्यास करणे’, हा प्रस्तुत संशोधनाचा उद्देश आहे. हे संशोधन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या ज्योतिष विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

‘रथसप्तमी’ या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व !

सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे जीवन सूर्यावर अवलंबून आहे; कारण सूर्य हा तेज (ऊर्जा) आणि प्रकाश हे दोन्ही देतो. माघ शुक्ल सप्तमीला (१६.२.२०२४ या दिवशी) ‘रथसप्तमी’ झाली. या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची प्रतिमा बनवून तिचे पूजन केले जाते.

‘रथसप्तमी’ या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व !

‘सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे जीवन सूर्यावर अवलंबून आहे; कारण सूर्य हा तेज (ऊर्जा) आणि प्रकाश हे दोन्ही देतो. माघ शुक्ल सप्तमीला ‘रथसप्तमी’ आहे. या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची प्रतिमा बनवून तिचे पूजन केले जाते. ‘रथसप्तमी’ तिथीचे आध्यात्मिक महत्त्व आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सादर केलेल्या भजनांच्या कार्यक्रमाचे सूक्ष्म परीक्षण !

भक्तांनी भजने गातांना सूक्ष्मातून विविध अनुभूती येणे आणि भजनांचे चैतन्य उच्च स्वर्गलोकापर्यंत जात असल्याचे जाणवणे…..