देवाच्या अनुसंधानात असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पनवेल, जिल्हा रायगड येथील कु. काव्यांश जुनघरे (वय ८ वर्षे) !

फाल्गुन शुक्ल अष्टमी (१७.३.२०२४) या दिवशी पनवेल, रायगड येथील बालसाधक कु. काव्यांश जुनघरे याचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई सौ. अमृता जुनघरे यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये आणि त्याच्यामध्ये जाणवलेले वैशिष्टपूर्ण पालट खाली दिले आहेत.

समंजस आणि राष्ट्र अन् धर्म यांचा अभिमान असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील कु. अथर्व विजय पाटील (वय १३ वर्षे) !

फाल्गुन शुक्ल षष्ठी (१५.३.२०२४) या दिवशी कु. अथर्व विजय पाटील याचा १३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या वडिलांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कै. राघवेंद्र माणगावकर यांचा मृत्‍यू आणि मृत्‍यूत्तर प्रवास यांचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘३.३.२०२४ या दिवशी पहाटे ४.३० वाजता मूळ कर्नाटकातील आणि सध्‍या नागेशी, गोवा येथे रहाणारे सनातनचे साधक राघवेंद्र माणगावकर यांचे अल्‍पशा आजाराने निधन झाले. त्‍यांचा मृत्‍यू आणि मृत्‍यूत्तर प्रवास यांचे श्री गुरुकृपेने माझ्‍याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.

उत्तम आकलनक्षमता, प्रेमभाव आणि सात्त्विकतेची ओढ असलेली ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. रुक्मिणी अविनाश जाधव (वय ४ वर्षे) !

नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी आश्रमात झालेल्या यज्ञाच्या वेळी २ दिवस ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ।’ हा मंत्र रुक्मिणीने ऐकला. तेव्हा तिला तो लगेचच मुखोद्गत झाला आणि तिने तो अचूक म्हणून दाखवला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत करण्यात आलेल्या ‘श्री दुर्गासप्तशती अनुष्ठाना’तील श्री दुर्गादेवीच्या चित्राच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

या अनुष्ठानाचा उद्देश ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांचे सर्व शारीरिक त्रास दूर व्हावेत आणि त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे’, हा होता. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य पूर्ण होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जिवंत रहाणे अत्यावश्यक आहे’, असे सप्तर्षींनी सांगितले आहे.

‘शक्य असेल, तेथे प्रत्यक्ष जाऊन सूक्ष्म परीक्षण केल्यास साधनेतील शक्ती अनावश्यक व्यय होत नाही’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत. ९ मार्च या दिवशी या लेखमालेतील काही भाग पाहिला, आज अंतिम भाग १८ पाहूया.

समष्टी सोहळे आध्यात्मिक आणि भावाच्या स्तरावर करण्याचे महत्त्व !

अयोध्येत होणार्‍या श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त त्या देवळात श्रीरामाचा सामूहिक आणि भावपूर्ण नामजप केला गेल्यामुळे देवळातील सूक्ष्म अंधार न्यून होऊन चैतन्य वाढणे.

शिवोपासना कशी करावी ?

शिवोपासना कशी करावी या विषयीचे शास्त्र प्रस्तुत लेखात देण्यात येत आहे.

शिवलिंगातील चैतन्य विज्ञान !

शिवलिंग हे एक यंत्र आहे. त्याला निरनिराळे रंग जर आणावयाचे असतील, तर विशिष्ट प्रकारचे मंत्र म्हणावे लागतात. मंत्र ही एक शक्ती आहे. प्रत्येक शब्दात, प्रत्येक अक्षरात, त्याच्या उच्चारांत, मंत्रसंख्येत सामर्थ्य निर्माण करण्याची शक्ती आहे.

नेरळ (कर्जत, जिल्हा रायगड) येथील पखवाजवादक श्री. छगन निमणे यांनी केलेल्या पखवाजवादनाचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘३.२.२०२४ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील आध्यात्मिक संशोधन केंद्रात नेरळ (कर्जत, जिल्हा रायगड) येथील पखवाजवादक श्री. छगन निमणे यांचे पखवाजवादनाचे प्रयोग घेण्यात आले. या प्रयोगांचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.