स्वभावदोष आणि चुका यांचे गांभीर्य असलेला, तसेच देवता अन् संत यांच्याप्रती भाव असलेला ५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील कु. स्वरोम दीपक आगावणे (वय १० वर्षे) !

‘मार्गशीर्ष कृष्ण पक्ष दशमी (१२.१२.२०१७) या दिवशी कु. स्वरोम दीपक आगावणे याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.

बालपणापासूनच देव, साधना आणि सत्सेवा यांची आवड असणारा अन् स्वभावदोष-निर्मूलनाचे गांभीर्य असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील कु. अद्वैत सागर पाटील (वय ७ वर्षे) !

‘मार्गशीर्ष कृष्ण पक्ष अष्टमी (१०.१२.२०१७) या दिवशी कु. अद्वैत सागर पाटील याचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याचे वडील, आजी-आजोबा आणि एक साधिका यांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने बँकॉक, थायलंड येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘आध्यात्मिकदृष्ट्या अधिक सात्त्विक चित्रकला’ या विषयावर शोधनिबंध सादर

२३ ते २५ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत बँकॉक, थायलंड येथे ‘समाजशास्त्र, कला आणि मानवता’ या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेत १५ देशांतील विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी, उदा. विद्यापिठांचे अधिष्ठाते, विशेष तज्ञ, प्राध्यापक, संशोधन करणारे विद्यार्थी आणि व्यावसायिक सहभागी झाले होते.

अन्नग्रहण करण्याची कृती आणि यज्ञकर्म यांतील साम्य

हिंदु धर्मात अन्नग्रहण करण्याच्या कृतीला यज्ञासमान मानले आहे. त्या संदर्भात सनातनच्या साधिका कु. मधुरा भोसले यांना मिळालेले ज्ञान येथे देत आहोत.

सनातनमध्ये सर्व देवी-देवच आहेत, असे सांगणारा ५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मिरज येथील बालसाधक चि. सुदर्शन किरण भोसले (वय ४ वर्षे) !

एकदा मी माझा नातू चि. सुदर्शन (वय ४ वर्षे) याच्या समवेत दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहात होते. त्या वेळी कार्यक्रमाच्या दरम्यान दाखवली जाणारी साबणाची विज्ञापने पाहून आमच्यात पुढील संभाषण झाले.

आयुुष्यभर प.पू. गुरुदेवांसमवेत रहाण्याची इच्छा असणारा मिरज येथील कु. राजेश्‍वर विनय शेट्टी (वय १२ वर्षे) !

परम पूज्य, तुम्ही मला मोठी शाळा, चांगले आई-वडील, आजी-आजोबा आणि एक छोटा दैवी भाऊ दिल्याविषयी मी तुमचा अत्यंत आभारी आहे. आयुष्यभर तुमच्यासमवेत रहायला मिळावे, अशी आमची इच्छा आहे. – कु. राजेश्‍वर शेट्टी (वय १२ वर्षे), मिरज

अग्नीचे गुणधर्म जोपासणारे ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्ण !

अग्नीला देवतांचे मुख मानले जाते त्यामुळे यज्ञकुंडातील अग्नीमध्ये अर्पण केलेल्या आहुती संबंधित देवतांपर्यंत विनासायास पोहोचतात.

आपत्काळात स्वतःचे रक्षण करता यावे, यासाठी ज्युडो शिकणारी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. पूर्ती अमेय लोटलीकर (वय ६ वर्षे) !

माझी भाची कु. पूर्ती लोटलीकर (वय ६ वर्षे) ज्युडो आणि कथ्थक नृत्य शिकत आहे. एकदा मी पूर्तीला विचारले, तू ज्युडो का शिकतेस ? ज्युडो शिकण्यासाठी शरीरयष्टी चांगली असावी लागते आणि कथ्थक या नृत्यप्रकारात नाजूक शरीरयष्टीला महत्त्व आहे.

उपास्यदेवता आणि देवी यांतील भेद

उपास्यदेवता : ही देवता मनुष्याचे हित चिंतणारी असते. साधकाच्या आध्यात्मिक उन्नतीला पूरक आणि व्यावहारिक जीवन जगण्यासाठी किमान गरजांची पूर्तता व्हावी, यांसाठी ती पूरक असते.

समंजस, सेवेची तळमळ आणि धर्माचरणाची आवड असणारी अन् इतरांना साहाय्य करणारी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. रुचिका जाधव (वय १५ वर्षे) !

कु. रुचिका जाधव हस्तपत्रके वाटणे, भित्तीपत्रके लावणे, सनातन प्रभात नियतकालिकांचे नूतनीकरण आणि वसुली करणे, उत्पादनांचे वितरण करणे इत्यादी प्रसारातील सेवा नियमित करते.


Multi Language |Offline reading | PDF