नरक चतुर्दशी

दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते. या सणाचे महत्त्व आणि करण्यात येणार्‍या कृतींमागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.

धनत्रयोदशी (धनतेरस)

दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने . . . धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. या दिनाचे महात्म्य, या दिवशी करायच्या कृतीमागील शास्त्र या लेखातून जाणून घेऊया.

कोजागरी पौर्णिमेचे व्रत

‘आश्विन मासातील पौर्णिमेला भगवती महालक्ष्मी ‘रात्री कोण जागे आहे ?’, हे पहाण्यासाठी भ्रमण करत असते. ‘जे जागरण करतात, त्यांना लक्ष्मी धन देते, असे म्हटले जाते. लक्ष्मीदेवी ‘को जागर्ति’ (कोण जागे आहे ?) असे म्हणत असल्याने या व्रताला ‘कोजागर’ असे म्हणतात.

हिंदूंनो, शक्तीदायिनी विजयादशमी कशी साजरी कराल ?

शमी पाप शमवते (नष्ट करते). शमीचे काटे तांबूस असतात. शमी रामाला प्रिय बोलणारी असून अर्जुनाच्या बाणांचे धारण करणारी आहे. हे शमी, रामाने तुझी पूजा केली आहे. मी यथाकाल विजययात्रेला निघणार आहे. ही यात्रा तू मला निर्विघ्न आणि सुखकारक कर.

दसर्‍याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने देण्याची महती !

आपट्याची पाने आप आणि तेज या कणांशी निगडित असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्त्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात. जेव्हा या आपट्याच्या पानांचे आदान-प्रदान होते, तेव्हा हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून जिवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात.

राजांच्या काळात साजरा होणारा विजयोत्सव !

राजांच्या काळात दसर्‍याच्या दिवशी हत्ती, घोडे यांना स्नान घालून त्यांच्यावर भरजरी वस्त्रे आणि अलंकार चढवून त्यांना राजवाड्यासमोर आणले जायचे.  सिंहासन पूजनानंतर राजे सीमोल्लंघनाला निघायचे. स्वस्तीवाचन व्हायचे. मिरवणुकीसमवेत रणवाद्येही असायची.

गोंधळाची परंपरा !

‘श्रीविष्णूच्या कर्णमळापासून निर्माण झालेल्या शुंभ आणि निशुंभ या दैत्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण आणि ऋषीगण यांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नाद-सुरांमध्ये आळवणी केली, म्हणजेच गोंधळ घातला. तेव्हापासून हिंदु धर्मात गोंधळाची परंपरा चालू झाली.

विजयादशमीचे रहस्य !

‘आश्विन शुक्ल दशमी हा दिवस सर्व भारतात ‘विजयादशमी’ म्हणून साजरा केला जातो. भारतियांच्या मूर्तीमंत पराक्रमांचा इतिहासच ‘विजयादशमी’त दिसून येतो. हिंदु समाजातील चारही वर्णांच्या दृष्टीने या दिवसाला महत्त्व आहे.

दुष्टांचे दमन आणि सुष्टांचे (सज्जनांचे) संरक्षण करणारी श्री दुर्गादेवी !

‘आश्विन शुक्ल ८, हा दिवस भारतात दुर्गाष्टमी म्हणून पाळण्यात येतो. जगात जेव्हा आसुरी वृत्ती प्रबळ होते, तेव्हा आदिशक्ती देवीरूपाने अवतीर्ण होऊन असुरांचा संहार करते, असा भारतीय जनतेचा विश्वास आहे. आदिमायेने अनेक अवतार घेतले असल्यामुळे तिला अनेक नावे प्राप्त झाली आहेत.