कामळेवीर (सिंधुदुर्ग) येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा जत्रोत्सव

कामळेवीर येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव २४ डिसेंबर २०२० या दिवशी साजरा होत आहे. या मंदिरात प्रत्येक एकादशीच्या दिवशी हरिपाठ म्हटला जातो, तसेच श्री रामनवमी आणि मार्च मासात श्री विठ्ठल-रखुमाईचा वाढदिवस साजरा केला जातो.

ओशेल, शिवोली येथील श्री देवी महाकालिका कुंभळेश्‍वर देवतांचा जत्रोत्सव !

ओशेल, शिवोली, बार्देश, गोवा येथील श्री देवी महाकालिका कुंभळेश्‍वर देवतांचा जत्रोत्सव मार्गशीर्ष शुक्ल पक्ष नवमी, २३ डिसेंबर २०२० या दिवशी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने या देवस्थानाविषयी माहिती देणारा लेख प्रसिद्ध करत आहोत.

डिचोली येथील श्री शांतादुर्गादेवीचा ‘नवा सोमवार’ उत्सव

संपूर्ण विश्‍वाला ताप देणार्‍या असुरांचा नाश केल्यानंतर दैत्यांच्या नाशार्थ मारक रूप धारण केलेल्या श्री शांतादुर्गादेवीने गोमंतकात येऊन शांत, तारक रूप धारण केले. तेव्हापासून तिला श्री शांतादुर्गा असे संबोधण्यात येऊ लागले.

अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद परमहंस भालचंद्र महाराज

भक्तांना दर्शन होताच त्यांच्या मनोकामना पूर्ण करणार्‍या परमहंस भालचंद्रबाबांचा ४३ वा पुण्यतिथी सोहळा २१ डिसेंबर २०२० ला कणकवली नगरीत साजरा होत आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी वाहिलेली शब्द सुमनांजली…

कोरगाव (पेडणे) येथील श्री भूमिकादेवीचा आज जत्रोत्सव

पेडणे तालुक्यातील कोरगाव येथील श्री भूमिकादेवीचा जत्रोत्सव मार्गशीर्ष शुक्ल पक्ष अष्टमी (२१.१२.२०२०) या दिवशी साजरा होत आहे. याविषयीची उपलब्ध माहिती येथे देत आहोत.

आरोंदा (सिंधुदुर्ग) येथील श्री सातेरी भद्रकाली देवतांचा जत्रोत्सव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथील श्री देवी सातेरी भद्रकालीचा जत्रोत्सव मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थीला साजरा केला जातो. या वर्षी हा जत्रोत्सव १८ डिसेंबर २०२० या दिवशी साजरा होत आहे.

कार्तिकस्वामी दर्शन सोहळा २०२०

‘कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामी दर्शनाचा योग येतो. सर्वसाधारणपणे ‘स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊ नये’, असे मानले जाते; परंतु या दिवशी स्त्रियांनीही कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते.

कार्तिकी एकादशी : संप्रदायाच्या मर्यादा ओलांडून श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत !

एकादशीच्या दिवशी सर्व प्राणीमात्रांची सात्त्विकता वाढत असल्याने या दिवशी व्रत केल्याने त्याचा अधिक लाभ होतो. सदर लेखातून कार्तिकी एकादशी हे व्रत करण्याची पद्धत, या दिवशी श्रीविष्णूला बेल आणि शिवाला तुळशीपत्र का वहावे इत्यादी माहिती जाणून घेऊया.

एकादशीचे व्रत कसे करावे ?

‘एकावर एक ११ म्हणजे एकादशी. याचा अर्थ एकत्व सोडू नये. या दिवशी लंघन करणे, उपवास करणे, याचा उद्देश आहे, लक्ष तिकडे न जाता भगवंताकडे रहावे; मात्र आता हा अर्थ गौण झाला आहे आणि उपवास प्रधान झाला आहे !

महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात साजरा होत असलेला ‘दीपोत्सव’ !

चेन्नई येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात १३ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत दीपोत्सव साजरा करण्याची आज्ञा केली. त्यानुसार १३ नोव्हेंबरपासून हा दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे.